शिराळा तालुक्यात कोविड१९ प्रतिबंदात्मक
 गांवाना जिल्हाधीकार्‍यांची भेट.

बाहेरील जिल्ह्यातुन आलेल्या व ५० वर्षांच्या वरील आजारी लोंकाचे स्वॅब तपासणी साठी घेण्याच्या सुचना



शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार)
शिराळा तालुक्यातील ५० वर्षाच्या पुढील आजारी असणाऱ्या लोकांच्या व  रायगड, पालघर ,ठाणे, मुंबई या चार जिल्ह्यातून आलेल्यांच्या घशाचे स्वँब घ्या कोकरूड येथील ग्रामिण रुग्णालयात विलगीकरणं कक्ष स्थापन करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
येथील तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समवेत आयोजित बैठकीत बोलत होते. थर्मल गन, ग्लोज,मास्क याची माहिती घेतली.
      शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील मणदूर,  काळोखेवाडी, करूंगली, खिरवडे, चिंचोली, कोकरुड - माळेवाडी, रिळे या गावात कोरोना रूग्ण आढळल्याने पश्चिम विभाग कोरोनाचा हाॅटस्पाॅट निर्माण झाला आहे. त्यामुळे शनिवारी सांगली चे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी मणदुर, कोकरुड,व रिळे या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
भेटी देवुन   लोकांनी घाबरून न जाता घरीच राहून काळजी घ्यावी. आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर प्रशासनाशी संपर्क साधा असे लोकांना आवाहन करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा सुरू असणारा सर्व्हे, मुंबईहून आलेले लोक, क्वारंटाईन झालेले लोक, गावात करण्यात आलेल्या विविध उपाय योजना यांचा आढावा घेतला.  जिल्हाधिकारी चौधरी यांनी मणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा  कामाचा आढावा घेतला. कामकाज समाधानकारक असल्याचे सांगत 
       त्यानी संपूर्ण माहिती घेतली. दैनंदिन कामकाज चांगले करा,   अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका याना पावसाळ्या मुळे आवश्यक रेनकोट व इतर साहित्य देण्याच्या सूचना ही दिल्या. सध्या पावसाळा सुरू झाल्याने  मणदूर येथील आरोग्य कर्मचारी यांच्या निवास्थानाच्या दुरुस्तीची मागणी सरपंच वसंत पाटील यांनी केली. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन चौधरी यांनी दिले. तर रिळे येथे उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी रिळे ग्रामस्थांनी केली.
     यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.आर.परब, एन.जे.गवारी म्हणाले की, मणदूर मध्ये  ४ पुरूष, दोन स्त्रिया, अशा सहा जणांचे रिपोर्ट पाॅजिटीव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कातील  ४७ लोकांचे नमुने घेतले आहेत. व काळोखेवाडी येथील एक स्त्री पाॅजिटीव्ह आहे.व संपर्कातील  ३ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे रिपोर्ट आलेले नाहीत. मणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राचने ७ टिम तयार केल्या आहेत. त्यांच्या मार्फत गावात दररोज तपासणी केली जाते.  ५० वर्षा वरील व गरोदर माता यांच्या विविध तपासणी करून सर्वे  करण्याचे काम सुरू आहे.  सर्दी, खोकला, ताप व इतर आजार असतील त्यानी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.  

यावेळी  प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल,  मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील, तालुका समन्वयक डॉ स्वाती पाटील, वैद्यकीय अधिकारी मणदुर येथे डॉ.मनजीत परब,  डॉ.नंदकुमार गवारी, मणदूरचे सरपंच वसंत पाटील,उपसरपंच विजय चौगुले,ग्रामसेवक एम.एन.पाटील,तलाठी भास्कर पाटील, वैद्यकीय अधिकारी एन.एम.घड्याळे,  सय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम, तर 
रिळे येथे   डॉ. व्ही.डी.घुले, डॉ.एस.टी. जाधव , सरपंच आशा आढाव, उपसरपंच बाजीराव सपकाळ , ग्रामसेवक तेजस्विनी घोडके, व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .