उंडाळे परिसरात राजरोसपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री.


उंडाळे- प्रतिनिधी (प्रदीप पाटील ), 
करोना विघ्नाने सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना 'बुरे दिन'चा सामना करण्याची वेळ आलेली असली तरी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मात्र कधी नव्हे असे 'अच्छे दिन' बघायला मिळाले आहेत. लॉकडाउनच्या काळातही चोरट्या मार्गाने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री धडाक्यात सुरू असून, या गोरखधंद्यास आळा घालण्यास प्रशासन कमी पडले आहे.करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनसह संचारबंदी लागू असुन ही. या काळात संपूर्ण उद्योग व्यवसाय ठप्प झालेले आहेत. सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पाचव्या  टप्प्यात झोननुसार शिथिलता मिळाल्याने काहीअंशी उद्योग व्यवसाय सुरू झाल्याने दोन दिवसांपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, लॉकडाउनच्या काळात सर्वच छोटे-मोठे उद्योग बंद असताना गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची चोरट्या मार्गाने वाहतूक व विक्री सर्रास सुरूच दिसुन येत असून यामुळे गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची मात्र आर्थिक भरभराट झाली. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांतून रात्रीत गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ विशिष्ट स्थळी पोहचवले जात आहेत. या व्यवसायातील माफियांनी खोऱ्याने कमाई केली आहे.
उंडाळे परिसरात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ गुटखा व तंबाखू विक्रेत्यांकडून आवश्यक सेवांमध्ये समाविष्ट. 

पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जिवनावश्यक वस्तुची विक्री करणा-यां छोटा-मोठ्या दुकानदाराबरोबरचं पान टपरीवाले लॉकडाउनच्या काळातही राजरोसपणे मोठ्या प्रमाणात विक्री सुरूच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.  राज्यात गुटखाबंदी असल्याने वाहतूक व विक्री ही चोरट्या मार्गानेच होते.काही व्यवसायिक तर गुटख्याची ग्राहकांना घरपोच सेवा देत आहेत.
मागील दाराने राजरोस विक्री
लॉकडाउनमध्ये पानटपऱ्या नावालाच बंद आहेत. सर्व पानटपरीधारक राहत्या घरातून व्यवसाय करीत आहेत. यात गुटख्याचा व्यवसाय सध्या प्रचंड तेजीत आहे. काही पानटपऱ्या मागील दाराने राजरोस सुरू आहेत. या सर्व प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलिस डोळेझाक करीत आहेत.
कोरोना या महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण भारत देश झगडताना दिसतो इथे मात्र नेमकी विरुद्ध परिस्थिती दिसून येते. शिंकताना खोकताना या विषानुचा प्रादुर्भाव फैलावत असल्याने लोकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे पण तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी लोकांची थुंकण्याची क्रिया ही होणारच आणि त्या संसर्गजन्य रोगाला एक प्रकारे उद्दीपन मिळणार.अशाप्रकारे संपूर्ण समाजाला कोरोनाच्या विळख्यात झोकणाऱ्या या तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांच्यावर  साथरोग नियंत्रण कायद्याखाली त्वरित कारवाई करून  त्यांचे दुकान परवाने त्वरित रद्द करण्यात यावेत . 




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .