मणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची भेट.

'आमदार मानसिंगराव नाईक व युवा नेते विराज नाईक यांचीही उपस्थिती '


वारणावती -प्रतिनिधी ( गणेश माने)
मणदूर येथे सातत्याने सापडणारे कोरोना रुग्नांच्या पार्श्वभूमीवर आज प्रा. आ. केंद्रास  जलसंपदा मंत्री मा. जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांनी भेट दिली. यावेळी युवा नेते विराज नाईक तसेच सभापती वैशाली माने हे उपस्थित होते.आरोग्य केंद्रात केल्या जाणाऱ्या उपाय योजनांचा आढावा घेतला.  रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी अजून कोणकोणत्या उपाय योजना कराव्या लागतील या बाबत  जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुडिलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. अधिक प्रभावी उपाय योजना करण्याबाबत सूचना केल्या. या वेळी प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल,   तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील, पंचायत समिती सदस्य बी. के. नायकवडी व मनीषा गुरव, सरपंच वसंत पाटील, उपसरपंच विजय चौगुले, आरोग्य अधिकारी एम. आर. परब, रामचंद्र नायकवडी, संचालक शिवाजी पाटील, संभाजी पाटील, स.पो.नि.दत्तात्रय कदम आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .