आंबेघर मध्ये ग्रामस्थांच्यासह एन.डी आर .एफ .चे बचावकार्य सुरू.
आंबेघर मध्ये ग्रामस्थांच्यासह एन.डी.आर .एफ .चे बचावकार्य सुरू.
"११ मृतदेह सापडले अजूनही चार जण मातीच्या ढिगाऱ्यात असण्याची शक्यता."
मोरगिरी वार्ताहर / किशोर गुरव.
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पावसाने घातलेले थैमान व माजवलेला हाहाकार यामुळे संपूर्ण जीवन विस्कळीत होऊन अनेक ठिकाणी वाईट दुर्घटना होऊन मोठ्याप्रमाणात मनुष्यहानी झाली आहे.अशीच दुर्घटना म्हणजे पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील आंबेघर येथील बुधवार पासून सुरू झालेला दमदार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी पुर येऊन घरांची नुकसान रस्ते बंद होऊन लोकांचा संपर्क तुटला मात्र अशातच मोरणा - गूरेघर धरणाच्या शेजारी असणारे गावठाण खालचे आंबेघर या ठिकाणी गुरुवारी रात्री २ ते ३ च्या दरम्यान दरड कोसळून सात घरे जमीनदोस्त झाली झाली तर या मातीच्या ढिगाऱ्यात चार कुटुंब अडकून राहिली आहेत.त्यामुळे त्या मातीच्या ढिगाऱ्यात अंदाजे १५ लोक अडकले होते त्यातील ११ मृतदेह काढले असून अद्यापही ४ लोक किंबहूना मृतदेह अडकले आहेत. अनपेक्षित घडलेल्या दुर्घटनेमुळे आंबेघरच नव्हे तर संपूर्ण मोरणा विभागावर शोककळा पसरली आहे.याबाबत अधिक असे की मोरणा - गूरेघर धरणाच्या शेजारी असणारे गावठाण खालचे आंबेघर या ठिकाणी अवघी नऊ कुटुंब राहत होती.गुरुवारी रात्री अचानकच डोंगराची कडा निसटून त्यातील सात घरावर कडा आल्याने ती सात घरे मातीच्या ढिगाऱ्यात गेली मात्र त्यातील तीन घरातील लोक घरातून बाहेर पळल्यामुळे त्यांचा जीव वाचला तर दोन घरे बचावली त्यामुळे त्या घरातील कोणतीही मनुष्यहानी झाली नाही याबाबत शुक्रवारी सकाळी स्थानिक व विभागातील नागरिक ,माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, तसेच उपविभागिय अधिकारी (पाटबंधारे) सागर खरात, तहसीलदार योगेश्वर टोंपे,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पोलीस पगडे,आरोग्य विभागाचे राजेश कदम हे पोचले मात्र त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण मोठे असलेने कोणतेही बचाव कार्य करू शकले नाही मात्र स्थनिक युवकांच्या मदतीने दिक्षी,शिदृकवाडी येथील लोक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली.शनिवारी सकाळी परत आंबेघर मध्ये ग्रामस्थांच्यासह एनडीआरएफचे बचावकार्य सुरू झाले यामधे विनोद वसंत कोळेकर, सुनीता विनोद कोळेकर,लक्ष्मी वसंत कोळेकर,मारुती वसंत कोळेकर, दोन लहान मुले (नावे समजू शकली नाही),सीमा सुनील कोळेकर,अनुसया लक्ष्मण कोळेकर,उमा धोंडीबा शिंदे,मंदाताई रामचंद्र कोळेकर व रामचंद्र विठल कोळेकर असे अकरा मृतदेह सापडले तर एक जिवंत मैस व एक शेळी वाचवण्यात यश आले सायंकाळी उशिरा पर्यंत बचावकार्य सुरू होते मात्र बाकीचे मातीच्या ढिगाऱ्यात सापडलेले लोक किंबुहुणा मृतदेह अद्यापही सापडलेले नाहीत तर घटनास्थळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील,गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई,माजी सभापती सत्यजित पाटणकर ,जिल्हाधिकारी शेखरसिंह,पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, तहसीलदार योगेश्वर टोंपे,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे उपस्थित होते तर महसूल,आरोग्य, पशुवैद्यकीय,विद्युत,बांधकाम अशा सर्वच विभागाची लोक होते तर पालकमंत्री व गृहराज्यमंत्री यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या आहेत.
गुरुवारी रात्री दोन अडीचच्या दरम्यान अचानक मोठा आवाज आला म्हणून आम्ही बाहेर आलो.बघतो तर मोठा मातीचा ढिगारा व सगळीकडे पाणीच पाणी आम्ही घाबरून सुरक्षित होते तेवढ्या लोकांना व मुलांना घेऊन अंधारातून मार्ग काढत धरणावर आलो व फोनवरून बाकीच्या लोकांनां माहिती दिली.
श्री.शामराव कोळेकर.
(दुर्घटनेतून बचाव झालेले स्थानिक नागरिक )

Comments
Post a Comment