तळ आंबेघर दुर्घटनेने वरच्या आंबेघरात स्मशान शांतता १४ मृतदेह सापडले बचावकार्य थांबले.
तळ आंबेघर दुर्घटनेने वरच्या आंबेघरात स्मशान शांतता १४ मृतदेह सापडले बचावकार्य थांबले.
मृतात ५ पुरुष,७ महिला तर ३ लहान बाळांचा समावेश.
९ महिन्याच्या बालकाचा मृतदेह सापडला नाही.
मोरगिरी वार्ताहर/किशोर गुरव.
पाटण तालुक्यातील अतिदुर्गम विभाग म्हणजे मोरणा विभाग या विभागात असलेल्या आंबेघर गावावर गुरूवारी रात्री २ ते ३ च्या दरम्यान काळाने घाला घातला आणि एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १५ लोकांचा जीव घेतला.रात्रीचा घरांवर कोसळलेला डोंगर कडा याची बातमी लागताच हा हा म्हणता ओढे,नाले,चिखल तर कमरेभर पाणी पार करून संपूर्ण मोरणा विभागातील युवक तसेच जिल्हा प्रशासन,ग्रामस्थ हे बचाव कार्यासाठी धडपडत होते नक्कीच कोणाचा तरी जीव वाचेल आणि परमेश्वर काही तरी चमत्कार करेल असे वाटत असतानाच शनिवारी दिवसभरात ११ मृतदेह सापडले तर रविवारी ३ मृतदेह सापडले असून ९ महिन्याच्या बालकाचा मृतदेह सापडलाच नाही त्यापूर्वीच बचावकार्य थांबले होते. असे एकूण १५ मृतदेह यामधे ५ पुरुष,सात महिला तर तीन लहान बाळांनचे मृता मध्ये समावेश असेलेमुळे तळ आंबेघर मधे घडलेल्या दुर्घटनेने गेले गेले तीन दिवस झाले वरच्या आंबे घरात स्मशान शांतता पसरली असून लोकांच्या मध्ये मोठे भीतीचे वातावरण तयार झाले आहे.शनिवारी सकाळी ग्रामस्थ व एनडीआरएफने सुरू केलेले बचावकार्य यामधे ११ मृतदेह सापडले मात्र सायंकाळी उशिरा ६ वाजेपर्यंत बचावकार्य सुरू ठेऊनही उरलेले ४ मृतदेह सापडले नव्हते.परत रविवारी सकाळी ग्रामस्थ व एनडीआरएफने बचावकार्य सुरू केले याचवेळी अथक प्रयत्न करून घटनास्थळी पोकलेन मशीन पोचवण्यात प्रशासनाला यश आले त्यामुळे बचावकार्यात फार मोठी मदत होऊ शकली दरम्यान रविवारी ३ मृतदेह सापडले तर ९ महिन्याच्या बालकाचा मृतदेह सापडला नाही असे आंबेघर दुर्घटनेत एकूण १५ मृतांचा समावेश असून त्या पैकी ३ लहान. बाळांचा समावेश आहे.मुर्तदेहांची नावे अशी विनोद वसंत कोळेकर वय ३२ , सूनिता विनोद कोळेकर वय २३ , विघ्नेश विनोद कोळेकर ६ , वेदिका विनोद कोळेकर ३ , लक्ष्मी वसंत कोळेकर वय ५२ , मारुती वसंत कोळेकर २२ , उमा धोंडीबा शिंदे वय १४ , लक्ष्मण विठ्ठल कोळेकर ५२ , अनुसया लक्ष्मण कोळेकर वय ४५ , रामचंद्र विठ्ठल कोळेकर वय ५५ , , ,मंदा रामचंद्र कोळेकर वय ५० ,दिनकर विठ्ठल कोळेकर वय ५० , हिराबाई दिनकर कोळेकर वय ४५ ,सीमा सुनील कोळेकर वय २३ , ९ महिन्याच्या बालकाचा मृतदेह सापडला नाही. दुर्घटनेत मृत पावलेली जनावरे पोकलेन मशीनने बाहेर काढून तिथेच बाजूला जमिनीमध्ये पुरण्यात आली तर आज सापडलेल्या तीन मृतदेहाना त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर वसंत कोळेकर यांच्या कुटुंबातील ६ व्यक्ती मृत झालेमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंबच संपले आहे.स्वतः वसंत कोळेकर हे पाटण या ठिकाणी कामाला गेल्यामुळे पूर आलेमुळे घरीच येऊ शकले नव्हते त्यामुळे त्यांचा बचाव झाला आहे.एकंदरीत आंबेघर मध्ये घडलेल्या दुर्घटनेचा अंदाज घेऊन प्रशासनाने मोरणा विभागातीलच नव्हे तर संपूर्ण पाटण तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावांचा विचार करून यावर कायतरी ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी लोकांची मधून प्रतिक्रिया उमटत होत्या.
पोर गेली,नातवंडं गेली, सून गेली, बायको गेली मी तरी जगून काय करू?
मोठ्याने टाहो फोडत माझे सगळे कुटुंबच संपले आहे आता मी तरी जगून काय करू माझी नातवंडं,माझी पोर, माझी सून ,माझी बायको कोणचं राहील नाही तर मी तरी जगून काय करू अशी प्रतिक्रिया ज्यांचे संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्यात मातिखाली जाऊन मृत झाले त्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख वसंत कोळेकर यांचा गगनभेदी आक्रोश.

Comments
Post a Comment