उंडाळे ग्रामपंचायतीचे नियमाचे उल्लघंन करण्या-या दुकानदारावर कारवाई.
उंडाळे ग्रामपंचायतीने नियमाचे उल्लघंन करण्या-या दुकानदारावर केली कारवाई.
उंडाळे - प्रतिनिधि,
उंडाळे ता. कराड येथील ग्रामपंचायतीने कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर दि.५ जुलै ते १२ जुलै पर्यंत व्यापारी बाजार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने सर्व व्यवसायीक व ग्रामस्थाना पुर्व कल्पना ही देण्यात होती, मात्र काही व्यवसायिकांनी ५जुलै सोमवार रोजी ग्रामपंचायत निर्णयावर दुर्लक्ष करत आपले व्यवसाय चालु ठेवल्याने संबधित व्यापारांवर रितसर कारवाई करण्यात आली.
ग्रामपंचायतीकडुन नियमांचे उल्लंघन करण्या-या ७ व्यवसायिकांना दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन उंडाळे व्यवसायिक, ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करुन कोरोना महामारीत नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावे उंडाळे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment