उंडाळे - तुळसण रस्त्याची दुरावस्था .
उंडाळे - तुळसण रस्त्याची दुरावस्था.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अपघात होण्या अगोदर डागडुजी करण्याची मागणी.
उंडाळे- प्रतिनिधि,
ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे देशाच्या रक्त वाहिन्या आहेत . त्यांची देखभाल देशाला जिवंत ठेवते , रस्त्यावरून परिसराचा विकास समजतो. तर ही जबाबदारी सांभाळणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्य आहे , मात्र गत काही महिन्यापासुन उंडाळे;चांदोली महामार्गातील उंडाळे नजिक असणाऱ्या पुलाचे काम चालु असल्या कारणामुळे या विभागातील सर्व वाहतुक ही उंडाळे-तुळसण मार्गावरुन वळवण्यात आल्याने ह्या रस्त्याची वाताहात झाली असुन संबधित बांधकाम विभागाचे रस्त्याकडे लक्ष देणे गरजे बनले आहे. ठिक-ठिकाणी रस्ता खराब झाला असुन , मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. पर्यायी मार्ग असल्यामुळे सर्व वाहनाची वाहतुक याच रस्त्यावरुन होत असुन पावसाळ्यात पाणी आणि रस्ता चा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले असुन एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सदरील रस्त्याचा धोका लक्षात घेता बांधकाम विभागाकडुन या बाबत लवकरात लवकर योग्य त्या उपाय योजना राबवण्याची मागणी उंडाळे, तुळसण विभागातील नागरिकांकडून होत आहे.

Comments
Post a Comment