Posts

Showing posts from July, 2022

अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन ठाण्यात.

Image
 अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन ठाण्यात. राज्यपाल कोश्यारींची उपस्थिती, त्यांचेहस्ते  होणार विविध  पुरस्कारांचे वितरण. सातारा - प्रतिनीधी. (विकास कांबळे.)       देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन यावेळी येत्या ८ ऑगष्ट ला ठाणे येथे आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनात महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस सह राजकिय,पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.     ठाणे येथे आयोजित अधिवेशन केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने , केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आले आहे   *एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनात कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे*  विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसाठी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.      यात ज्...

स्कूल बसेसची तपासणी होणार .

Image
स्कूल बसेसची  होणार  तपासणी. ब्यूरो रीपोर्ट - गोंडवाना न्यूज.  राज्यभरातील स्कूल बसेसची तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केले आहेत. वाहनांमधून अवैधरीत्या शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.  विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या राज्यभरातील स्कूलबसेसची तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाकडून राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत. 31 जुलैपर्यंत ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. विद्यार्थी सुरक्षेच्यादृष्टीने स्कूलबससाठी नियम घालून देण्यात आले आहेत. यामध्ये बसचे योग्यता प्रमाणपत्र, बसमधील आसनव्यवस्था आदींबाबत अनेक तरतुदी आहेत. मात्र, सद्य:स्थितीत नियमभंग करुन विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.  तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबसेस शिवाय इतर वाहनांमधून अवैधरीत्या शालेय विद्यार्थी वाहतूक सुरू आहे. यामुळे विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातील परिवह...

कराड पंचायत समिती गण निहाय आरक्षण सोडत 2022.

Image
  कराड पंचायत समिती गण निहाय  आरक्षण सोडत 2022. गोंडवाना न्यूज नेटवर्क पंचायत समिती कराड गण निहाय आरक्षण. कराड पंचायत समिती आरक्षण सोडत 2022 * अनुसूचित जाती प्रवर्ग* 1) काले  -- महिला राखीव 2) कोर्टी --- महिला राखीव 3) सुपने --- पुरुष *नागरिकांचा मागास प्रवर्ग* OBC  4) आटके --- महिला राखीव 5) चरेगाव---  महिला राखीव 6) वडगाव हवेली -- महिला राखीव 7) कोळे -- पुरुष 8) इंदोली --- पुरुष 9) सैदापूर--- पुरुष *सर्वसाधारण महिला* तळबीड  वारुंजी  वाघेरी  येळगाव पाल  उंब्रज  कोपर्डे हवेली  मसूर  किवळ *खुला वर्ग* हजारमाची कोयना वसाहत  कार्वे  उंडाळे  शेरे  ओंड  रेठरे बुद्रुक  गोळेश्वर  तांबवे  विंग.

मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान मार्फत लोककल्याण मेळावा-२०२२ संपन्न.

Image
  मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान मार्फत लोककल्याण मेळावा-२०२२ संपन्न. शिराळा : प्रतिनिधी.  शिराळा  येथे मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान मार्फत लोककल्याण मेळावा-२०२२ हा कार्यक्रम संपन्न झाला. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक हे प्रमुख पाहुणे होते. माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, विकास अधिकारी संतोष राऊत, विश्वासचे जेष्ठ संचालक दिनकरराव पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती प्रल्हाद पाटील प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष कै. संपतराव शिंदे यांचे आकस्मिक निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान चे मुख्य प्रवर्तक विराज नाईक यांनी स्वागत व प्रास्तविक केले. गट विकास अधिकारी राऊत, तहसीलदार शिंदे, लाभार्थी भारती संदीप दिवे (सागाव), महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती बी. के. नायकवडी, माजी जिल्हा परिषद सदस्य नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसि...

सातारा जिल्हाधिकारी पदी रुचेश जयवंशी,यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

Image
  सातारा जिल्हाधिकारी पदी  रुचेश जयवंशी,यांनी जिल्हाधिकारी पदाचा  पदभार स्वीकारला. सातारा दि. 23  : रुचेश जयवंशी यांनी सातारा जिल्हाधिकारीपदाचा  मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून  जिल्हाधिकारी पदाचा  पदभार स्वीकारला।       मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. जयवंशी यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. जयवंशी यांनी सातारा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

रूचेश जयवंशी हे सातारचे नवे जिल्हाधिकारी.

Image
रूचेश जयवंशी हे सातारचे नवे जिल्हाधिकारी. कराड: प्रतिनिधी. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बदली झाली असून रूचेश जयवंशी यांची सातारचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या आज शासनाने जाहीर केल्या असून सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या जागी रूचेश जयवंशी हे सातारा जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

गणेशोत्सव, दहीहंडी उत्साहात आणि शांततेत साजरा करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Image
  गणेशोत्सव, दहीहंडी उत्साहात आणि शांततेत साजरा करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे मिळणार  नोंदणी शुल्क, हमी पत्राची अट शिथिल.              मुंबई, दि. 21 :- गणेशोत्सव, दहीहंडी  आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण - उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावेत यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेंतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यानी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.             सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात तसेच विविध व्यवस्थेबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आली. ...

तुळसणची जलपरी तिचा राज्यभर डंका.

Image
  तुळसणची जलपरी तिचा राज्यभर डंका. कु.श्वेता कुराडे हीची जलतरण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पारितोषिक. उंडाळे - प्रतिनिधी. ४८ वी राष्ट्रीय जलतरण स्पर्धा ओडिसा येथे नुकतीच पार पडली.यामध्ये  "स्विमिंग वॉटर पोलो" या जलतरण प्रकार  स्पर्धेमध्ये   महाराष्ट्राच्या टीमला द्वितीय क्रमांकाचे  विजेतेपद मिळवून देण्यामध्ये कु. श्वेता कुराडे हिने मोलाची कामगिरी बजावली.या कामगिरीबद्दल कु. श्वेता हिचा विशेष पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.   परिस्थितीचा विचार न करता. अपार कष्ट, धेय्य,इच्छाशक्तीच्या जोरावर, आई-वडील, शिक्षक, व मार्गदर्शक शिक्षक,यांनी माझ्यावरती टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात यापेक्षा चांगली कामगिरी करणार असल्याचे मत कु.श्वेता कुराडे यांनी व्यक्त केले. श्वेताच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरांमधून तिचं कौतुक होतंय.

कृष्णा बँकेच्या चेअरमनपदी डॉ. अतुल भोसले यांची बिनविरोध निवड.

Image
  कृष्णा बँकेच्या चेअरमनपदी डॉ. अतुल भोसले यांची बिनविरोध निवड. व्हाईस चेअरमनपदी दामाजी मोरे यांची निवड. कराड, ता. २१ : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी डॉ. अतुल भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमनपदी दामाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा सहकारी बँकेला कृष्णाकाठची अर्थवाहिनी म्हणून ओळखले जाते. सुवर्णमहोत्सवी वर्षे पूर्ण केलेल्या या बँकेच्या सन २०२२-२३ ते २०२६-२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली. आज झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत कराड तालुका सहकारी संस्थांचे उपनिबंधक संदीप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी डॉ. अतुल भोसले यांची चेअरमनपदी; तर दामाजी मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.   नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार य. मो. कृष...

काळगांव परिसरात भात लावणीस प्रारंभ.

Image
  काळगांव परिसरात भात लावणीस प्रारंभ. तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील काळगांव विभागात महत्त्वाचे पीक असलेल्या भात लावणीच्या कामांना जोरदार सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांसाठी लागवणीसाठी महिलाही शेतात भात लागण करताना दिसत आहेत. त्यामुळे शेत शिवार माणसांनी गजबजून गेला आहे. धुळवाफेवरील भात पेरणी ते भातलावणी असा काहीसा क्रम या विभागातील पेरणीमध्ये आढळून येतो. कमी पाण्यावरील व जास्त पाण्यावरील भाताची पिके घेतली जातात. ज्या ठिकाणी कमी पाणी अशा ठिकाणी धूळवाफेवारील भाताचे पीक व ज्या ठिकाणी पाणी मुबलक असते तेथे भात लावणी करण्यात येते. डोंगरकपारीतील डाकेवाडी, लोटळेवाडी, मस्करवाडी, मळाईचीवाडी, निवी, कसणी, निगडे, वरचे घोटील, सातर, तामीणे, पाळशी, पानेरी या गावात नाचणीचे पीक घेतले जाते. त्यास या भागात ‘आवटणे’ असे म्हटले जाते. भात लावणीनंतर पेरणी करण्याचा हंगाम संपतो असे म्हटले तरी ते वावगे ठरु नये. धूळवाफेवरील पेरणी पूर्ण केल्यानंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे भांगलणी, कोळपणी अशी कामे शेतकरी उरकतात. यंदा मात्र पावसाने उघडीप न दिल्याने ही कामे खोळंबली आहेत. दरम्यान, याच कालावधीत भात लावणीसाठी तरवा टाक...

ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण.

Image
ओ.बी. सी समाजाला २७ टक्के आरक्षण. ब्युरो रीपोर्ट  गोंडवाना न्यूज.  सर्वोच्च न्यायायलाने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणासंबंधित बांठिया आयोगाचा अहवाल स्विकारला असून याच अहवालानुसार निवडणुका घ्याव्यात असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवाय सर्व निवडणुका पुढील २ आठवड्यांनतर जाहीर कराव्यात असेही आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.  न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आता २७ टक्के आरक्षण मिळणार आहे. राज्य सरकारने नेमलेल्या बांठिया समितीच्या अहवालामध्ये राज्यात सरासरी 37 टक्केच ओबीसी असल्याचे नमूद केले आहे. राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी बांठिया समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या बांठिया समितीनुसार राज्यात सरासरी 37 टक्केच ओबीसी असल्याचे नमूद केले आहे. बांठिया समितीने मतदार यादीच्या आधारे हा अहवाल बनवला आहे. राज्यात ओबीसींना 27 टक्के राजकीय आरक्षणांची शिफारस केली आहे पण प्रत्येक जिल्ह्यात आरक्षणाची टक्केवारी वेगवेगळी असणार आहे. आद...

‘वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड’ मध्ये डी.एस.दिक्षीत यांच्या नावाची नोंद.

Image
  ‘वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड’ मध्ये डी.एस.दिक्षीत यांच्या नावाची नोंद. तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील कुठरे येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक म्हणजे दामोदर शामराव दिक्षीत उर्फ डी.एस.दिक्षीत यांनी लाॅकडाऊनच्या काळाचा सदुपयोग करत जाळीदार पिंपळाच्या पानावर 75 विविध कलाकृती रेखाटल्या होत्या. या चित्राची नोंद नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड या पुस्तकात झाली आहे. त्याचे सर्टीफिकेट आणि मेडल त्यांना मिळाले आहे. ‘वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड’ या पुस्तकाने दिक्षीत सर यांची दखल घेतल्याने त्यांच्या कलात्मक उपक्रमाला ‘चार चाॅंद’ लाभले आहेत. या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. या कामी त्यांना पत्नी रुक्मिणी, मुले ज्योती आणि चेतन यांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे नेमणूक आणि सेवानिवृत्ती ही कुठरे येथील हायस्कूलवर झाली. आपले काम, आणि त्याच्याशी प्रामाणिकपणा हे तत्व त्यांनी सेवा काळात अत्यंत कसोशीने जपले. त्यामुळेच ते सेवानिवृत्ती नंतरही आपल्या कलेच्या विश्वात रमून गेलेले पहावयास मिळतात. आटके येथील कलाशिक्षक एस.एन.पाटील, चुलते राम सुतार आणि पांडुरंग सुतार यांच्या कलेतील कामाचा प्र...

शेतकरी चळवळीचे नेते साजिद मुल्ला यांचे निधन.

Image
    शेतकरी चळवळीचे नेते  साजिद मुल्ला यांचे निधन. कराड - प्रतिनिधी. गोवारे (ता-कराड.) येथील शेतकरी चळवळीचे नेते बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला यांचे  हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीला एक मोठा धक्का बसला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

शिराळा येथे नागपंचमी मा. न्यायालयाच्या आदेशास अधीन राहून साजरी होणार.

Image
  शिराळा येथे नागपंचमी मा. न्यायालयाच्या आदेशास अधीन राहून साजरी होणार. शिराळा - प्रतिनिधी. जगप्रसिद्ध शिराळा नागपंचमी मा. न्यायालयाच्या आदेशास अधीन राहून साजरी करत असताना स्थानिक प्रशासन ही काही अटी घालत असल्याने पारंपरिक नागपंचमी सण साजरा करताना अडचणी येत आहेत. यासाठी प्रशासनाचे योग्य सहकार्य मिळावे या मागणीसाठी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे मा. जिल्हाधिकारीसो यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. तसेच सांगली जिल्हा पोलिस अधिक्षक मा. दीक्षित गेडामसोा यांची भेट घेऊन पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळावे अशी मागणी केली.  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जितेंद्र डूडी, युवा सहकारी मा. सम्राट महाडीक, शिराळा पंचायत समिती माजी सभापती मा. हणमंतराव पाटील, मा. प्रतापराव यादव, युवा नेते रणजितसिह नाईक, मा. सम्राट शिंदे, मा. हिंदूराव नांगरे, मा. संभाजी नलवडे, नगरसेवक मा. केदार नलवडे, मा. लालासो तांबीट, मा. अभिजित शेणेकर, मा. जयसिंग गायकवाड, मा. अरविंद शिंदे, मा. बंटी नांगरे, मा. सत्यजित कदम, मा. सचिन नलवडे, मा. शुभम देशमुख, मा. दर्शन जोशी, मा. श्रेयस महाजन, मा. प्रविण गायकवाड, मा....

डाक विभागाच्या वतीने व्हिजन फॉर इंडिया 2047 या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजन.

Image
  डाक विभागाच्या वतीने व्हिजन फॉर इंडिया 2047 या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजन.   कऱ्हाड -  प्रतिनिधी. येथील डाक विभागाच्या वतीने व्हिजन फॉर इंडिया 2047 या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. पत्र लेखन मोहीमेंतर्गत 31 ऑक्टोबर 2022 अखेर राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा होणार आहे. मराठी किंवा हिंदी भाषेत पत्र लिहून ते मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र परिमंडळ कार्यालय मुंबई 400001 या पत्त्यावर पाठविण्याचे आहे. सदरचे पत्र ए फोर साईज पेपरवर लिहून एक हजार शब्दापेक्षा जास्त नसावे किंवा अंतर्देशिय पत्रावर पाचशे शब्दांपेक्षा जास्त नसावे. फक्त हाताने लिहीलेलेच पत्र स्विकारले जाईल. ही स्पर्धा सर्वांसाठी व सर्व वयोगटासाठी खुली आहे. हे पत्र लिहून ते जवळच्या पोस्ट ऑफीसमध्ये जमा करावे. ३१ ऑक्टोंबरनंतर पोस्ट केलेले पत्र स्विकारले जाणार नाही. पत्र लिहीणाऱ्याने त्यांच्या वयाचा दाखला देणे अपेक्षित आहे. त्यासाठी जन्मतारखेचा पुरावा जोडावा. या स्पर्धेत जास्त जास्त लोकांनी सहभाग घ्यावा. या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावरील पुरस्कार असे ः प्रथम २५ हजार, व्दितीय दहा हजार, तृतीय पाच हजार रुपये रोख. ...

राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित.

Image
राज्यातील  नगर परिषदा आणि  नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित. गोंडवाना न्यूज नेटवर्क -   राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगानं नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.  पुणे  सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे , नंदुरबार, जळगाव अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड , उस्मानाबाद, लातूर  अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92  नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या.

पेट्रोल 5 रू व डिझेल 3 रू स्वस्त.

Image
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्वपुर्ण  निर्णय. गोंडवाना  न्यूज नेटवर्क - 🔴  पेट्रोल 5 रू व डिझेल 3 रू स्वस्त महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा.  🔴सरपंच व नगराध्यक्ष  निवडणूक थेट जनतेतून  होणार. 🔴अनुदान योजनेतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना वगळणार  नाही. 🔴बाजार समितीतील सर्व शेतकर्यांना थेट मतदानाचा अधिकार.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती.

Image
  जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती.              मुंबई, दि. 12 (रा.नि.आ) : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.             राज्य निवडणूक आयोगाने 5 जुलै, 2022 रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात आज सुनावणी झाली. एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.  

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील दरडी हटविण्याचे काम सुरु.

Image
  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील दरडी हटविण्याचे काम सुरु. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना. सातारा दि. 11 : सातारा जिल्ह्यात पाटण, महाबळेश्वर, वाई, सातारा, कराड तालुक्यात चांगला पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर दरडी कोसळ्ण्याचे प्रकार समोर येत आहे.  सार्वजनिक बांधकाम विभाग याची तात्काळ दखल घेऊन दरडी हटविण्याचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेऊन  वाहतुक सुरळीत करीत आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने  यंत्रसामुग्री सज्ज ठेवली आहे. जुलै-२०२२ मध्ये या मंडळाअंतर्गत येणाऱ्या महाबळेश्वर, वाई, जावली, पाटण, कराड, सातारा,  खंडाळा या तालुक्यांमध्ये आठवड्याभरात बऱ्याच भागात अतिवृष्टी झाली आहे. महाबळेश्वर, वाई, जावली, पाटण या तालुक्यांमध्ये मागील ४ दिवसामध्ये प्रतिदिन सुमारे १०० ते २१३ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. पावसाळ्यातही  रस्ते सुस्थितीत ठेवणेसाठी शासनस्तरावरून वार्षिक देखभाल दुरूस्तीचा कार्यक्रम मंजूर झालेला आहे. या वर्षीच्या   पावसाळ्यात दरडी पडणे, झाडे उन्मळुन पडणे, पुल व मोऱ्यांमध्ये दगड-धोंडे, झाडे अडकणे, तसे...

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा.

Image
  आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची  सपत्नीक महापूजा.  'बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी  कोरोनासह सर्व अडचणी दूर कर'- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे.    बीड जिल्ह्यातील मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले या वारकरी  दांपत्याला महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे वितरण.                   सोलापूर /पंढरपूर दि. 10(जिमाका) :-आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची  परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे  सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कोठे ही कमी पडणार नसल्याची ग्वाही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.   समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यसमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठला...

डाॅ.संदीप डाकवेंच्या कलाकृतींचे इलेक्ट्राॅनिक्स मिडीयाकडून प्रसारण.

Image
  डाॅ.संदीप डाकवेंच्या कलाकृतींचे इलेक्ट्राॅनिक्स मिडीयाकडून प्रसारण. तळमावले/वार्ताहर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गेली काही वर्षापासून मोरपिसावर संत तुकाराम, घराच्या भिंतीवर वारीचे चित्र, वारीचे शुभेच्छा पोस्टर, एका पानावर हरिपाठ, शब्दातून विठूरायाची विविध रुपे असे कलात्मक उपक्रम पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षर वारकरी डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवले आहेत. यांची दखल इलेक्ट्राॅनिक्स मिडीयाने घेवून त्यांचे थेट प्रसारण केले आहे. कॅलिग्राफीच्या माध्यमातून रेखाटलेल्या विठूरायांच्या विविध चित्रांची भुरळ वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींना पडली. न्यूज 18 लोकमतचे विशाल परदेशी, किरण मोहिते, स्वप्नील घाग यांनी गुरुवार दि.7 जुलै व शुक्रवार दि. 8 जुलै, 2022 रोजी ‘भेटी लागी जीवा’ या कार्यक्रमात, एबीपी माझा चे प्रतिनिधी राहुल तपासे, आप्पासाहेब मोहरकर यांनी रविवार दि.3 जुलै, 2022 रोजी ‘माझा विठ्ठल माझी वारी’ या कार्यक्रमात, लोकशाही चॅनेलचे प्रतिनिधी प्रशांत जगताप यांनी मंगळवार दि.28 जून, रविवार दि. 3 जुलै, बुधवार दि.6 जुलै, 2022 रोजी ‘वारी लोकशाही संगे’ या कार्यक्रमात तसेच ‘झी टाॅकीज’ ने ...

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहिम.

Image
  शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा यांचेमार्फत विशेष तपासणी मोहिम.   सातारा दि. 8 :  नवीन शैक्षणिक वर्ष सन 2022-23 नुकतेच सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांचेमार्फत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये योग्यता प्रमाणपत्र, स्कुलबस परवाना तसेच इतर सर्व वैध कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना विद्यार्थी वाहतूकीस परवानगी देण्यात येणार नाही याची वाहतूकदार, शिक्षण संस्था, व्यवस्थापन व पालकांनी नोंद घ्यावी असे सहाय्यक प्रादेशिका परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी कळविले आहे.   महाराष्ट्र शासनाने दि. 22.3.2011 रोजी अधिसूचना जारी केली असून त्यानुसार  स्कूल बस संदर्भातील नियमावली लागू केली आहे. नागपूर उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र. 2/2012 या सुनावणीच्यावेळी या संदर्भात मा. न्यायालयाने शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्...

ब्रह्मदास पतसंस्थेच्या चेअरमनपदी मारूती मोहिते.

Image
  ब्रह्मदास पतसंस्थेच्या चेअरमनपदी मारूती मोहिते. ‌व्हा. चेअरमनपदी महादेव मोहिरे : बिनविरोध निवडी संपन्न, सभासद, ठेवीदार, हितचिंतकांकडून अभिनंदन कराड/प्रतिनिधी :    बेलवडे बुद्रुक ता. कराड येथील ब्रह्मदास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यानुसार संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीही नुकत्याच बिनविरोध संपन्न झाल्या. यामध्ये चेअरमनपदी मारूती मोहिते व व्हाईस चेअरमनपदी महादेव मोहिरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.    संस्थेच्या प्रधान कार्यालयात गुरुवारी ७ रोजी सकाळी चेअरमन मारूती मोहिते व व्हाईस चेअरमन महादेव मोहिरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.आर. मोरे, सर्व संचालक व सभासद वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी, संस्थेने निवडणूक बिनविरोध करून सहकार क्षेत्रात एक आदर्श पायंडा पाडला असल्याचे मत सभासदांनी व्यक्त केले.    संस्थेच्या नवीन संचालक मंडळामध्ये चेअरमन मारुती मोहिते (आबा), व्हाईस चेअरमन महादेव मोहिरे यांच्यासह संचालक संस्थापक अध्यक्ष वसंतराव मोहिते (सर),...

आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सहकार्यातून तात्काळ मदतकार्य सुरु करावे.

Image
  आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सहकार्यातून तात्काळ मदतकार्य सुरु करावे. - पालक सचिव ओ. पी. गुप्ता . जिल्हास्तरीय मान्सून पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबतीत आढावा बैठक संपन्न.     सातारा दि.7:   जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस पडत आहे. कुठेही अतिवृष्टीमुळे आपत्ती निर्माण झाली तर त्या ठिकाणी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्यातून तात्काळ मदतकार्य सुरु करावे, असे निर्देश  जिल्ह्याचे पालक सचिव ओ. पी. गुप्ता यांनी दिले.  जिल्हास्तरीय मान्सून पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकामी आढावा बैठक श्री. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली.यावेळी श्री. गुप्ता बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, मह...

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण कार्यक्रम जाहीर.

Image
  जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण कार्यक्रम जाहीर. सातारा दि. 6 :  महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम,1961 मधील कलम 12 उपकलम (1), कलम 58(1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणासाठी  पध्दत व चक्रानुक्रम) नियम,1966 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवण्याच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे,तसेच  आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करून त्यावर हरकती व सूचना सादर  कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे. या कार्यक्रमानुसार सातारा जिल्हा परिषद व सर्व पंचायत समित्यांनी दि. 13 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता सभा घेऊन दि. 15 जुलै 2022 रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करावे व आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबधीत तहसिलदार यांचेकडे हरकती व सूचना दिनांक 15/07/2022 ते दिनांक 21/07/2022 पर्यंत सादर कराव्यात, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी कळविले आहे. 1. अनुसूच...

आषाढीच्या महापुजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण .

Image
  आषाढीच्या महापुजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. 'मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली भेट' . मुंबई, दि. ५ :- पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले.  समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली तसेच त्यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन सत्कार केला.  याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य आदी उपस्थित होते.