मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान मार्फत लोककल्याण मेळावा-२०२२ संपन्न.

 मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान मार्फत लोककल्याण मेळावा-२०२२ संपन्न.

शिराळा : प्रतिनिधी.

 शिराळा  येथे मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान मार्फत लोककल्याण मेळावा-२०२२ हा कार्यक्रम संपन्न झाला. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक हे प्रमुख पाहुणे होते. माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, विकास अधिकारी संतोष राऊत, विश्वासचे जेष्ठ संचालक दिनकरराव पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती प्रल्हाद पाटील प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष कै. संपतराव शिंदे यांचे आकस्मिक निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान चे मुख्य प्रवर्तक विराज नाईक यांनी स्वागत व प्रास्तविक केले. गट विकास अधिकारी राऊत, तहसीलदार शिंदे, लाभार्थी भारती संदीप दिवे (सागाव), महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती बी. के. नायकवडी, माजी जिल्हा परिषद सदस्य नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगभाऊ यांनी मुख्य मनोगत व्यक्त केले. आमदार नाईक यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते अपंग, दिव्यांग प्रमाणपत्र व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिलेल्या ३५० लाभार्थ्यांना पत्रांचे वाटप करण्यात आले. उदय पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास नायब तहसीलदार अरुणकुमार कोकाटे, अव्वल कारकून संध्याराणी निकम, तसेच प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, विश्वास व विराज उद्योग समूहातील विविध संस्थांचे संचालक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, शिराळा नगरपंचायत सर्व नगरसेवक, विविध गावचे मान्यवर, पदाधिकारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .