जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण कार्यक्रम जाहीर.

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण कार्यक्रम जाहीर.

सातारा दि. 6 :  महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम,1961 मधील कलम 12 उपकलम (1), कलम 58(1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणासाठी  पध्दत व चक्रानुक्रम) नियम,1966 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवण्याच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत
काढणे,तसेच  आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करून त्यावर हरकती व सूचना सादर  कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे. या कार्यक्रमानुसार सातारा जिल्हा परिषद व सर्व पंचायत समित्यांनी दि. 13 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता सभा घेऊन दि. 15 जुलै 2022 रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करावे व आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबधीत तहसिलदार यांचेकडे हरकती व सूचना दिनांक 15/07/2022 ते दिनांक 21/07/2022 पर्यंत सादर कराव्यात, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी कळविले आहे.


1.अनुसूचित जाती (महिला),अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसारण (महिला) यांच्या करिता आरक्षण सोडतीची सूचना परिशिष्ट – मधील नमुन्यात प्रसिध्द करणे

07/07/2022


2. अनुसूचित जाती (महिला),अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसारण (महिला) यांच्या करिता आरक्षीत जागा निश्चित करणेकरिता सोडत काढणे. 

अ)जिल्हा परिषद निवडणूक विभाग.


13/07/2022


ब) पंचायत समिती निर्वाचक गणासाठी.

3. सोडतीनंतर निवडणूक विभाग/निर्वाचक गणनिहाय आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिध्द करणे.

15/07/2022


4.निवडणूक विभाग/ निर्वाचक गणनिहाय आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी.

15/07/2022 ते 21/07/2022


5.आरक्षण, सोडतीचा अहवाल तसेच सोडतीवर प्राप्त झालेल्या व सुचना अभिप्रायसह  राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करावे.

25/07/2022


6.  प्रारूप आरक्षण अधिसूचनेनुसार प्राप्त हरकती व सूचनावरील जिल्हाधिकारी यांचे अभिप्रायसह राज्य निवडणूक  विभाग/निर्वाचक गणाचे आरक्षणास मान्यता देणे.

29/07/2022


7.  राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या निवडणूक विभाग/निर्वाचक गणाचे अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द करणे.

02/08/2022


 


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .