तुळसणची जलपरी तिचा राज्यभर डंका.
तुळसणची जलपरी तिचा राज्यभर डंका.
कु.श्वेता कुराडे हीची जलतरण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पारितोषिक.
उंडाळे - प्रतिनिधी.
४८ वी राष्ट्रीय जलतरण स्पर्धा ओडिसा येथे नुकतीच पार पडली.यामध्ये "स्विमिंग वॉटर पोलो" या जलतरण प्रकार स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या टीमला द्वितीय क्रमांकाचे विजेतेपद मिळवून देण्यामध्ये कु. श्वेता कुराडे हिने मोलाची कामगिरी बजावली.या कामगिरीबद्दल कु. श्वेता हिचा विशेष पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
परिस्थितीचा विचार न करता. अपार कष्ट, धेय्य,इच्छाशक्तीच्या जोरावर, आई-वडील, शिक्षक, व मार्गदर्शक शिक्षक,यांनी माझ्यावरती टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात यापेक्षा चांगली कामगिरी करणार असल्याचे मत कु.श्वेता कुराडे यांनी व्यक्त केले.
श्वेताच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरांमधून तिचं कौतुक होतंय.

Comments
Post a Comment