डाक विभागाच्या वतीने व्हिजन फॉर इंडिया 2047 या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजन.
डाक विभागाच्या वतीने व्हिजन फॉर इंडिया 2047 या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजन.
कऱ्हाड - प्रतिनिधी.
येथील डाक विभागाच्या वतीने व्हिजन फॉर इंडिया 2047 या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. पत्र लेखन मोहीमेंतर्गत 31 ऑक्टोबर 2022 अखेर राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा होणार आहे. मराठी किंवा हिंदी भाषेत पत्र लिहून ते मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र परिमंडळ कार्यालय मुंबई 400001 या पत्त्यावर पाठविण्याचे आहे. सदरचे पत्र ए फोर साईज पेपरवर लिहून एक हजार शब्दापेक्षा जास्त नसावे किंवा अंतर्देशिय पत्रावर पाचशे शब्दांपेक्षा जास्त नसावे. फक्त हाताने लिहीलेलेच पत्र स्विकारले जाईल. ही स्पर्धा सर्वांसाठी व सर्व वयोगटासाठी खुली आहे. हे पत्र लिहून ते जवळच्या पोस्ट ऑफीसमध्ये जमा करावे. ३१ ऑक्टोंबरनंतर पोस्ट केलेले पत्र स्विकारले जाणार नाही. पत्र लिहीणाऱ्याने त्यांच्या वयाचा दाखला देणे अपेक्षित आहे. त्यासाठी जन्मतारखेचा पुरावा जोडावा. या स्पर्धेत जास्त जास्त लोकांनी सहभाग घ्यावा. या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावरील पुरस्कार असे ः प्रथम २५ हजार, व्दितीय दहा हजार, तृतीय पाच हजार रुपये रोख. स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारामध्ये बक्षिस प्रथम ५० हजार, व्दितीय २५ हजार तर तृतीय पुरस्कार दहा हजार रुपयांचा आहे, असे अधिक्षक डाकघर, कराड विभाग यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
--------------------------
.jpeg)
Comments
Post a Comment