शिराळा येथे नागपंचमी मा. न्यायालयाच्या आदेशास अधीन राहून साजरी होणार.
शिराळा येथे नागपंचमी मा. न्यायालयाच्या आदेशास अधीन राहून साजरी होणार.
शिराळा - प्रतिनिधी.
जगप्रसिद्ध शिराळा नागपंचमी मा. न्यायालयाच्या आदेशास अधीन राहून साजरी करत असताना स्थानिक प्रशासन ही काही अटी घालत असल्याने पारंपरिक नागपंचमी सण साजरा करताना अडचणी येत आहेत. यासाठी प्रशासनाचे योग्य सहकार्य मिळावे या मागणीसाठी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे मा. जिल्हाधिकारीसो यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. तसेच सांगली जिल्हा पोलिस अधिक्षक मा. दीक्षित गेडामसोा यांची भेट घेऊन पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळावे अशी मागणी केली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जितेंद्र डूडी, युवा सहकारी मा. सम्राट महाडीक, शिराळा पंचायत समिती माजी सभापती मा. हणमंतराव पाटील, मा. प्रतापराव यादव, युवा नेते रणजितसिह नाईक, मा. सम्राट शिंदे, मा. हिंदूराव नांगरे, मा. संभाजी नलवडे, नगरसेवक मा. केदार नलवडे, मा. लालासो तांबीट, मा. अभिजित शेणेकर, मा. जयसिंग गायकवाड, मा. अरविंद शिंदे, मा. बंटी नांगरे, मा. सत्यजित कदम, मा. सचिन नलवडे, मा. शुभम देशमुख, मा. दर्शन जोशी, मा. श्रेयस महाजन, मा. प्रविण गायकवाड, मा. संतोष गायकवाड, मा. संकेत शिंदे, मा. संतोष डांगे, मा. शंकर डांगे आदींसह नाग मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment