Posts

Showing posts from December, 2022

कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे योग प्रशिक्षण उत्साहात साजरे.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे योग  प्रशिक्षण उत्साहात साजरे. उंडाळे - प्रतिनिधी. माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजेबरोबरच  सुदृढ आरोग्यासाठी योग करणे ही सुध्दा माणसाची गरज बनली आहे असे प्रतिपादन योग प्रशिक्षक श्री महालिंग मुंढेकर यांनी केले. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आपले आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे विसरून चालला आहे परंतु विद्यार्थ्यांना त्याच्या उज्वल भविष्यासाठी अभ्यासाबरोबर  आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यासाठी  एक दिवशीय योग प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिक करून त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमावेळी श्री महालिंग मुंढेकर यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच सूत्रसंचालन प्रियंका आलेकरी यांनी केले तर आभार  दीप्ती पाटील यांनी मानले.

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगावं येथे यशाची गुरुकिल्ली या विषयावरती व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगावं येथे यशाची गुरुकिल्ली या विषयावरती व्याख्यान संपन्न.   उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासा अंतर्गत यशाची गुरुकिल्ली या विषयावर डॉ. स्वानंद कुलकर्णी प्राचार्य श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ      इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी घोगाव यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी त्यांनी यश म्हणजे काय ते सुरुवातीपासूनच कसे मिळवावे व ध्येय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी कसे प्रयत्न करावेत व त्या दिशेने कशी वाटचाल करावी किंवा सकारात्मक विचार हे किती महत्त्वाचे असतात याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचाऱ्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले व सूत्रसंचालन व आभार यांनी केले.

कोडोली मध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

Image
  कोडोली मध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न. कराड - प्रतिनिधी. कोडोली ता. कराड येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित कोडोली शाखेचा प्रथम वर्धापन दिन मारुती मंदिर कोडोली ता. कराड येथे मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न झाला. या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम  दोन दिवसा मध्ये पार पडला पहिल्या दिवशी सोमवारी  श्री स्वामी समर्थ महाराजांची भव्य दिव्य पालखी संपूर्ण कोडोली गावातून काढण्यात आली. यामध्ये गावातील महिला व  श्री स्वामी समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची महानैवद्य आरती व दिंडोरी प्रणित  मार्गाविषयी मोफत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शुगर व बीपी तपासणी करण्यात आली. तसेच तज्ञ वैद्य यांचे मार्गदर्शन आणि विविध मानवी आजारावर मोफत मार्गदर्शन करण्यात आले होते.या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य डॉक्...

सांगली जिल्ह्यातील जेष्ठ नेते जनार्दन यशवंत पाटील (काका) यांचे निधन.

Image
  सांगली जिल्ह्यातील जेष्ठ नेते जनार्दन यशवंत पाटील (काका) यांचे  निधन. शिराळा - प्रतिनिधी.      सांगली जिल्ह्यातील जेष्ठ नेते,वाळवा पंचायत समितीचे माजी सभापती, राजाराम बापू सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जनार्दन यशवंत पाटील (काका) यांचे सोमवारी दुपारी बेळगाव येथे निधन झाले. येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८३ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी ९ वाजता कासेगाव (ता.वाळवा) येथील त्यांच्या गावातील वाड्यासमोर अंत्यदर्शना साठी ठेवण्यात येणार असून कृष्णा नदी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.        ते लोकनेते राजारामबापू पाटील यांचे पुतणे,माजी मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांचे चुलत भाऊ,तर सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष,युवा नेते देवराज पाटील,जिल्हा परिषद सदस्या संगीता पाटील यांचे वडील होत. जनार्दनकाका पाटील यांनी तरुण वयातच सार्वजनिक जीवनास सुरुवात करून त्यांचे वडील माजी सरपंच,राजारामबापू सहका...

श्री कोटेश्वर विद्यालय गोवे येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा.

Image
 श्री. कोटेश्वर विद्यालय गोवे येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा. कराड प्रतिनिधी:- ( प्रविण पाटील) श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोवे येथे गणित दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात गणितीय रांगोळ्या, गणितीय मॉडेल्स, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  . यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व बक्षिस देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक गाडगीळ साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती . तसेचे संस्थेचे अध्यक्ष नंदाभाऊ जाधव , सचिव तुकाराम आण्णा जाधव संचालक भुजंगराव जाधव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले . तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील गणित शिक्षक श्री लक्ष्मण उबाळे सर व टकसाले सर,कदम मॅडम यांनी परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले तसेच कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती विभा साबळे मॅडम व सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळ उपस्थित होते.

मालदन ग्रामपंचायत निवडणुकीत ना.शंभूराज देसाई प्रणित पॅनेलने २५ वर्षानंतर सत्तांतर करीत मोठा विजय मिळविला.

Image
  मालदन ग्रामपंचायत निवडणुकीत ना.शंभूराज देसाई प्रणित पॅनेलने २५ वर्षानंतर सत्तांतर करीत मोठा विजय मिळविला.   ढेबेवाडी   - प्रतिनिधी (सागर पाटील)   ढेबेवाडी विभागातील एक मोठी असणाऱ्या मालदन गावच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या गटाच्या पॅनलने राष्ट्रवादी प्रणित पॅनेलचा धुव्वा उडवित सरपंच पदासह आठ जगावर विजय मिळवून सत्तांतर घडविले. गीतांजली काळे या लोकनियुक्त सरपंच झाल्या. विजयासाठी ना.शंभूराज देसाई प्रणित पॅनेलचे प्रमुख जोतिराज काळे प्रा. यशवंत काळे दत्ता कारंडे प्रशांत घारगे सांभाजी काळे यांच्या बरोबर युवा नेते नितीन काळे यांनी कार्यकर्त्यांना बरोबर घेवून जीवाचे रान करीत मोठा विजय संपादन केला आणि विजयात सिंहाचा वाटा उचलत किंगमेगर ठरले.             मालदन ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आजपर्यंत त्यांची गावावर एकहाती सत्ता होती.गावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कै.मधुकर काळे गुरुजी यांची हुकमत चालत आली होती. त्यांच्या नंतर राष्ट्रवादीची पक्कड ढीली झाली असल्याचे दिसून येत आहे. जोतिराज काळ...

द. इंग्लिश मीडियम स्कूल उंडाळे येथील विद्यार्थ्यांचे यश.

Image
 द. इंग्लिश मीडियम स्कूल उंडाळे येथील विद्यार्थ्यांचे यश.  उंडाळे - प्रतिनिधी. द इंग्लिश मीडियम स्कूल उंडाळे येथील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय झालेल्या स्पर्धेमध्ये घवघवीत यश.  या स्पर्धेमध्ये विविध प्रकारच्या मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सदगुरु  गाडगे  महाराज  कॉलेज या  ठिकाणी  स्पर्धा पार पडल्या. यामध्ये उंडाळे येथील विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय आणि जिल्हा साठी निवड करण्यात आली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे द इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापिका गीतांजली पाटील यांनी अभिनंदन केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक देसाई सर, मैदानी खेळाचे प्रशिक्षक पांडुरंग पाटील, शिक्षक तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयाचे यश.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयाचे यश. उंडाळे - प्रतिनिधी. श्री. संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म, घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी नुकतेच यश संपादन केले. महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल फार्मसी कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या संयुक्तरित्या आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा पार पडली त्यामध्ये कु. अनुजा कुंभार व कु.  अक्षदा बेंगडे या विद्यार्थिनींनी  द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून पदविका फार्मसीच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. सदर विद्यार्थिनींना मार्गदर्शन महाविद्यालयाच्या  प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम व प्रा. प्रियांका आलेकरी मॅडम यांनी केले. या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी मॅडम सचिव प्रसुन जोहरी सर, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या संघटक पदी ज्ञानेश्वर शेवाळे यांची निवड.

Image
  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या संघटक पदी ज्ञानेश्वर शेवाळे यांची निवड. कराड -प्रतिनिधी. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या संघटक पदी ज्ञानेश्वर शेवाळे यांची निवड. येवती तालुका कराड येथील सुपुत्र दैनिक लोकमतचे पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे ,यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या संघटक पदी सन 2023 साठी नियुक्ती करण्यात आली. ही  नियुक्ती केंद्रीय अध्यक्ष  मनोहर  सुने , केंद्रीय संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .या नियुक्ती, बद्दल पत्रकार  शेवाळे यांचे  सर्व स्तरातून  अभिनंदन होत आहे.  .

खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार.

Image
  खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार. ब्रिगेडीयर जेम्स थॉमस, सातारा एस.पी.समीर शेख यांचाही विषेश सन्मान  कराड ः विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. त्याच कार्यक्रमात ब्रिगेडीयर जेम्स थॉमस, साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. १५ डिसेंबरला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल अशी माहिती विजय दिवस समारोह समितीचे सचीव अॅड. संभाजीराव मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  विजय दिवस समारोहातील कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समितीचे विनायक विभुते,  सहसचीव विलासराव जाधव, उद्योजक दिपक अरबुणे, सलिम मुजावर, विजय दिवस समितीचे मीनल ढापरे, चंद्रकांत जाधव , रमेश जाधव,  प्रा. बी एस खोत,  रत्नाकर शानभाग, परवेझ सुतार, महालिंग मुंढेकर, सतीश उपळाविकर आदी उपस्थित होते. अॅड मोहिते म्हणाले, कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा रौप्यमहोत्सव विजय दिवस साजरा होत आहे. विजय दिवस सम...

नारायण शेवाळे यांचे निधन .

Image
  नारायण शेवाळे यांचे निधन .    उंडाळे - प्रतिनिधी. येवती तालुका  कराड  येथील  ज्येष्ठ नागरिक नारायण परसू शेवाळे यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या  पश्चात  पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे ,असा परिवार आहे. रक्षा विसर्जन  रविवार  दिनांक 11/12/2022 रोजी येवती येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे..

श्री. बाळसिद्ध विद्यालय,घोगाव ची विद्यार्थिनी निबंध लेखन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम.

Image
 श्री. बाळसिद्ध विद्यालय,घोगाव ची विद्यार्थिनी निबंध लेखन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम. उंडाळे - प्रतिनीधी.        ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळेचे श्री. बाळसिद्ध विद्यालय घोगाव या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.सोनल अशोक साळुंखे या विद्यार्थिनीने सातारा जिल्ह्यामध्ये निबंध स्पध्ये मध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला. महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ व सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मा.ता.का.सूर्यवंशी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त,सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे आधारवड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी १४ सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. त्या निमित्ताने प्रत्येक तालुक्यात विविध स्पर्धा होतात त्यामध्ये तालुकास्तरावरून श्री.बाळसिद्घ विद्यालय,घोगांव विद्यालयाची विद्यार्थीनी कु. सोनल अशोक साळुंखे ही कराड तालुक्यामध्ये तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली होती.२४ सप्टेंबर रोजी राष्ट्रभाषा भवन,बारावकर नगर सातारा  येथे जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या. यामध्ये श्री. बाळसिद्ध विद्यालय,घोगांव ची विद्यार्थिनी कु. सोनल अशोक ...

मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी 41 बालके मुंबईकडे रवाना.

Image
  मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी 41 बालके मुंबईकडे रवाना.   सांगली दि. 6 (जि. मा. का.) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 41 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया होणार असून ही बालके आज शस्त्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन स्वतंत्र बसमधून त्यांच्या पालकासह एस. आर. सी. सी. रूग्णालय मुंबईकडे रवाना झाल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर बस मुंबईकडे मार्गस्थ झाल्या.   जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या  मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गावोगावी अंगणवाडी सेविकांचे स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे डी.ई.आय.सी. मधील दैनंदिन रूग्णसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. पुनश्च: अशाच प्रकारचे  अंगणवाडी सेविका व आशा यांचे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन सुरू आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.  सिव्हील रूग्णालय सांगली येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्ह...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन.

Image
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन. कराड - प्रतिनिधी.  समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयात ग्रंथप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी साप्ता. कराड वार्ताचे संपादक ईलाही मुल्ला म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय समाजाला समतेची  वाट दाखवणारे महापुरुष होते. त्यांनी गुलामगिरीची साखळी तोडून सर्वांना मुक्त केले. शिका,संघटित व्हा, आणि संघर्ष करा असा संदेश दिला.  त्या प्रसंगी धनाजी मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ग्रंथालयाने वेगवेगळ्या  सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य केले त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.    कार्यक्रमास मा. विवेकानंद मुळे, संदीप शेळके, सीमा कांबळे, ग्रंथालयाचे वाचक, सभासद उपस्थित होते. आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ  यांनी मानले.

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी, घोगाव महाविद्यालयात कौशल्य विकास शिबिर संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी, घोगाव महाविद्यालयात कौशल्य विकास शिबिर संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी -(डी फार्म) घोगाव येथे सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी कौशल्य विकास शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांना संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज घोगावच्या अधिव्याख्याता सौ. शीतल मोहिते यांनी संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याविषयी मूलभूत माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी सौ. शितल मोहिते यांचे स्वागत केले. तर सूत्रसंचालन प्रा. दीप्ती पाटील यांनी केले.

संवाद, समन्वय आणि लोककल्याण या विचाराने यंत्रणा व प्रसार माध्यमांनी शासकीय योजनांच्या प्रसिद्धीत योगदान द्यावे.

Image
  संवाद, समन्वय आणि लोककल्याण या विचाराने यंत्रणा व प्रसार माध्यमांनी  शासकीय योजनांच्या प्रसिद्धीत योगदान द्यावे. समता पर्वानिमित्त आयोजित कार्यशाळेत वक्त्यांचा सूर.                सांगली दि. 2 (जि.मा.का.) :- शासनाच्या लोककल्याणाच्या योजनांची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संवाद, समन्वय आणि लोककल्याण  या विचारानुसार शासकीय यंत्रणा आणि प्रसार माध्यमांनी एकत्रित येऊन जनकल्याणाच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योगदान द्यावे, असा सूर सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत वक्त्यांनी व्यक्त केला.         समता पर्वा निमित्त सामाजिक न्याय विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी सामाजिक न्याय विभागाची  नवी दिशा या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होते. कार्यशाळेस  दैनिक लोकमत, सांगलीचे आवृत्ती प्रमुख श्रीनिवास नागे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा समाज कल...

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगाव  या महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी  राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत यश संपादन केले. जेनेसिस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी राधानगरी येथे झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी अनुजा कुंभार व अक्षदा बेंगडे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थिनींना मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम व प्रियांका आलेकरी मॅडम  यांनी  केले. तसेच टी-शर्ट पेंटिंग व प्रश्नमंजुच्या स्पर्धेमध्ये पूर्वा पवार, सानिका कदम, मानसी पाळसांडे व निशा धाष्टे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी मॅडम, सचिव श्री प्रसुन जोहरी सर, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.