ग्रामपंचायत चिंचोली व जि.प.शाळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा.
ग्रामपंचायत चिंचोली व जि.प.शाळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा. शिराळा - प्रतिनिधी. ग्रामपंचायत चिंचोली व जि प शाळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सरपंच सौ कविता पाटील व मुख्य ध्यापिका सौ मंदाकिनी मोरे यांनी ध्वजारोहण केले या कार्यक्रमासाठी माजी सरपंच पै.संपतराव जाधव, उपसरपंच सौ. रूपाली जाधव, माजी सरपंच पै. शरद जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनिल जाधव, रणजित पाटील, पै.धनाजी जाधव, सौ.प्रियांका जाधव, पोलिस पाटील मा.भरत चव्हाण, पै.उत्तम पाटील, विजय पाटील,वैभव पाटील, आरोग्य विभाग अंगणवाडी सेविका शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. ज्ञान मंदिर अभ्यासिका व वाचनालयाचे संस्थापक माजी सैनिक संभाजी जाधव यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शालेय साहित्य वाटप केले. स्वागत सावंत सर यांनी केले विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले आभार ग्रामविकास अधिकारी मा पी एम पाटील यांनी मानले.