कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे मनोज सोनी यांचे फार्मास्युटिकल प्रोडक्ट डेव्हलोपमेंट या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फार्मसीच्या विविध विषयातून फार्मसीचे ज्ञान तर मिळतच असते. पण इंडस्ट्रीमध्ये नेमके कसे फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार केले जातात, त्याच्यासाठी काय प्रोसेस असते, प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी काय प्रक्रिया आहे. व विविध प्रकारचे प्रोडक्ट त्यासाठी लागणारे विविध परवाने, अधिकार तसेच त्या प्रोडक्टसचे महत्त्व व जनरिक व ब्रॅण्डेड प्रोडक्ट व पेटेंट याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
मनोज सोनी हे सध्या ग्लेनमार्क फार्मास्युटिल लिमिटेड येथे जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच सूत्रसंचालन व आभार प्रा. पूजा भोसले यांनी केले.

Comments
Post a Comment