कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे प्रसाद भागवत यांचे संवाद कौशल्य या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर इतर गोष्टीचे ज्ञान हवे. तसेच संवाद कौशल्य ही असायला हवे कारण संवादामुळे आपण कोणत्याही क्षेत्रांमध्ये स्वतःची चांगली प्रगती करू शकतो. त्यामुळे कुठलीही नोकरी, व्यवसाय याठिकाणी संवाद कौशल्य हे आपल्याला एका उत्तम ठिकाणी पोहचवू शकते. म्हणूनच या व्याख्यानाचे विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजन करण्यात आले होते.
या वेळी प्रसाद भागवत यांनी संवाद कौशल्याचे विविध प्रकार विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच त्याचे महत्त्व व संवाद कौशल्यामध्ये आपल्या चेहऱ्याचे हावभाव, शरिराची मुद्रा कशी असावी. व संवादामध्ये व्याकरण खूप महत्त्वाचे आहे हे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच सूत्रसंचालन व आभार प्रा. मोनिका शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.

Comments
Post a Comment