कृषिकन्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

 कृषिकन्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. 

कार्वे - प्रतिनिधी.

वडगाव हवेली येथे  जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे बुद्रुक येथील कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना कृषी रसायने वापरताना कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. ग्रामीण जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत कृषिकन्या गावामध्ये कार्यरत करत असताना शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक घेऊन विविध माहिती बद्दल मार्गदर्शन केले. कृषी रसायनामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे आजार तसेच शरीरासाठी घातक असल्यामुळे कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना विविध प्रकारे काळजी घेऊन कृषी रसायने व्यवस्थितपणे वापरावे यासाठी जागृत केले. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, समन्वयक प्रा. डी. एस. भिलवडे, कार्यक्रमाधिकारी पी. पी.पाटील, प्रा. पी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या वैष्णवी घोडके, सेजल हसबे ,श्रावणी गायकवाड प्रेरणा हिले ,श्वेता बोंबे ,स्नेहल घाडगे, अस्मिता कोळी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .