कृषिकन्यांकडून शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने झाडे लावण्याचे प्रात्यक्षिक.
कृषिकन्यांकडून शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने झाडे लावण्याचे प्रात्यक्षिक.
कार्वे- प्रतिनिधी
जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे बुद्रुक येथील कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने झाडे लावण्याचे प्रात्यक्षिक याचे मार्गदर्शन केले. ग्रामीण जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत कृषिकन्या गावामध्ये कार्यरत करत असताना शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक घेऊन विविध माहिती बद्दल मार्गदर्शन केले. या प्रात्यक्षिकामध्ये कृषी कन्यांनी सांगितले की झाडे योग्य अंतरावर लावावे व झाडांची खोली योग्य असावी तसेच झाडांना जैविक व रासायनिक घटक योग्य प्रमाणात दिल्यास झाडांची वाढ पोषक होते .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, समन्वयक प्रा. डी. एस. भिलवडे, कार्यक्रमाधिकारी पी. पी.पाटील, प्रा.डॉ. डी.एस.माळी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या वैष्णवी घोडके, सेजल हसबे ,श्रावणी गायकवाड, प्रेरणा हिले ,श्वेता बोंबे ,स्नेहल घाडगे, अस्मिता कोळी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Comments
Post a Comment