सातारा जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची सहविचार सभा संपन्न.
सातारा जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची सहविचार सभा संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
सातारा जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची सहविचार सभा मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संगमनगर सातारा येथे संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीलाच राज्याध्यक्ष प्रमोद मोरे व प्रमुख अतिथींचे हस्ते वडाच्या झाडाचे व शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला प्रारंभ करण्यात आला पाहुण्यांचा परिचय राज्याच्या उपाध्यक्ष सावंत मॅडम यांनी करून दिला. यावेळी बोलताना श्री मोरे म्हणाले पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण या क्षेत्रामध्ये सातारा विभागाचे काम संपूर्ण राज्यामध्ये उत्तम आहे या क्षेत्रामध्ये सातारा जिल्हा नेहमी अग्रेसर असतो कार्यकारणीच्या सर्व सदस्यांनी अशाच पद्धतीने काम चालू ठेवून सातारा जिल्ह्याचे नाव पर्यावरण रक्षणामध्ये उज्वल करावे असे आवाहन त्यांनी केली यावेळी जिल्हाध्यक्षांच्या सहमतीने कार्यकारणी मध्ये सतीश राजे घाडगे, जगन्नाथ माळी व संजय कुलकर्णी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली सर्व उपस्थितांच्या हस्ते सोसायटीच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रमोद मोरे यांचा सत्कार सातारा जिल्हा पर्यावरण व प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष नामदेव जगदाळे यांनी शाल व रोप देऊन केला श्री. भोजने सर जिल्हा संघटक, गायकवाड सर, खवळे सर आदींचा सत्कार ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला राज्य संघटक श्रीपाटील सर यांचा सत्कार श्री मोरे यांच्या हस्ते करण्यात आला सूत्रसंचालन संजय बरांगळे यांनी केले तर आभार सौ पवार मॅडम यांनी मानले व सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली


Comments
Post a Comment