दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि पंचशील करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने " समता फोर्स कॅम्प" संपन्न.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि पंचशील करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने " समता फोर्स कॅम्प" संपन्न.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल आणि पंचशील करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने " समता फोर्स कॅम्प " चे दि. 1/9/2024 ते दि. 7/9/2024आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा सांगता समारोप पंचशील करिअर अकॅडमी पलूस येथे संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. भीमराव यशवंतराव आंबेडकर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष तसेच मा. एस के भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्टाफ ऑफिसर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी समता फोर्स कॅम्पच्या जवानांनी आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब आणि आदरणीय एस के भंडारे साहेब यांना मानवंदना दिली.
यावेळी समता फोर्स कॅम्पच्या जवानांनी परेड, जुडो कराटे, लाठीकाठी चे प्रात्यक्षिक दाखविले. आदरणीय भीमराव आंबेडकर यांचा सत्कार आयु. रवींद्रजी लोंढे आणि आ. रुपेश तामगावकर साहेब सांगली जिल्हा पूर्व आणि पश्चिमचे अध्यक्ष यांनी संयुक्तरित्या केला. त्यावेळी पंचशील करिअर अकॅडमी पलूस चे संस्थापक हिम्मत होवाळ यांचा सत्कार आ. भीमराव आंबेडकर साहेब यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. रुपेश तामगावकर साहेब यांनी केले समता फोर्स कॅम्प चे जवान राजरत्न थोरात मेजर पुणे प्रशांत माळी मुंबई प्रविण सपकाळे जळगाव रवींद्र खर्चै अकोला यांनी मनोगत व्यक्त केले आयु डी एम आचार्य हेडकॉटर सचिव लेफ्टनंट जर्नल यांनी आपले विचार मांडले
या सात दिवसाच्या कॅम्पचे प्रशिक्षण देण्यासाठी समता सैनिक दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी आदर्श ब्लड सेंटर सांगली यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आली
या कार्यक्रमा वेळी मा. भीमराव आंबेडकर साहेब यांनी प्रमुख मार्गदर्शन केले तसेच मा. एस के भंडारे साहेब यांनीही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कांबळे सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा पश्चिम यांनी केले तर आभार रवींद्र लोंढे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सांगली पश्चिम यांनी मानले या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील जवानांनी भाग घेतला होता तर सांगली जिल्हा पूर्व विभाग आणि पश्चिम विभाग मधील असणाऱ्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी समता सैनिक दलाची जवान बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments
Post a Comment