वारणा विद्यालय सागांव येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

 वारणा विद्यालय सागांव येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न.


ब्युरो रिपोर्ट गोंडवाना न्यूज.

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला.

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मधील विद्यार्थी शिक्षक दिन कार्यक्रम नियोजन व कार्यवाही व्ही.डी . पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली  केले गेले

समारंभाच्या प्रारंभी श्री. भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील ( भाऊ) संचालक डॉ. प्रकाश कांबळे , संचालक श्री. गजानन पाटील,संचालक रघुनाथ पवार यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन महात्मा ज्योतिबा फुले , व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच संस्था अध्यक्ष व संचालक यांनी विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवकांना गुलाबपुष्प देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थी शिक्षक नेहा नाकील ,आर्या नरळे,मनस्वी मोरे,मोनिका देसाई,स्वप्नाली लुगड,ऐश्वर्या माने ,पायल ,सानिका नाईक, कष्णाली लुगड, रिया माने , सलोनी कांबळे,आर्या वाघ ,अस्मिता माने आदि इ. 5 वी ते  9 वी विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम केले .

विद्यार्थी शिक्षक समारंभाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.सी सदावर्ते  सर यांनी भूषविले याप्रसंगी ऐश्वर्या माने ,स्वप्नाली लुगड,पायल सोयटेल आर्या नरळे,आर्य वाघ आदींनी शिक्षक म्हणून काम करताना आलेले  अनुभव व शिक्षक महत्त्व सांगितले.तसेच व्हि. डि. पाटील सर बी.एम. नलवडे सर यांनी याप्रसंगी मनोगते व्यक्त केली.विद्यार्थी शिक्षक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या नरळे हिने केले,तर आभार प्रदर्शन ऐश्वर्या माने हिने  केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .