Posts

Showing posts from February, 2025

महिला महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.

Image
महिला महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.  "नवीन शैक्षणिक धोरणाची वाणिज्य शिक्षणातील भूमिका" या विषयावर  प्रा. डॉ. राजेशकुमार चेतीवाल यांनी केलं मार्गदर्शन. कराड - प्रतिनिधी.  शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड व अग्रणी महाविद्यालय बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने "नवीन शैक्षणिक धोरणाची वाणिज्य शिक्षणातील भूमिका" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा महिला महाविद्यालय कराड येथे संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी मा. प्रा. डॉ. राजेशकुमार चेतीवाल, वाणिज्य विभागप्रमुख कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. स्नेहल प्रभुणे या होत्या. प्रा. डॉ. राजेशकुमार चेतीवाल यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची वाणिज्य शिक्षणातील भूमिका मांडताना या धोरणामुळे भविष्यात होणारे बदल तसेच येऊ घातलेल्या स्किल आधारित कोर्सची माहिती सांगितली. अध्यक्षीय मनोगतात  प्राचार्या प्रो. डॉ. स्नेहल प्रभुणे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री. संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे शैलेश झेंडे यांचे अंडरस्टँडिंग द फार्मासुटिकल बिजनेस लँडस्केप इन एशिया या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  सध्या ते मेघा लाइफ सायन्स, इंडोनेशिया कंपनीमध्ये जनरल मॅनेजर म्हणून  काम पाहत आहेत. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना प्राचीन काळापासून औषधाचा शोध कसा लागला उदाहरणार्थ पेनिसिलीन, इन्सुलिन कोविड लस तसेच उच्च प्रतीचे ड्रग जेनेरिक ड्रग, ओव्हर द काउंटर ड्रग इत्यादी औषधाबद्दल माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. मोनिका शिंदे यांनी मानले.

दयाराम काळुखे (नाना) – एक समाजनिष्ठ कार्यकर्ता हरपला.

Image
  दयाराम काळुखे (नाना) – एक समाजनिष्ठ कार्यकर्ता हरपला. गोंडवाना न्यूज वृत्तसेवा:- चचेगावचे ज्येष्ठ नागरिक, कराड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक आणि रयत संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते श्री. दयाराम काळुखे (नाना) यांच्या दुःखद निधनाने सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. घरची परिस्थिती हालाखीची असताना त्यांनी जिद्दीने शिक्षण घेतले आणि आर्थिक सुबत्तेसाठी मुंबईत चांगल्या नोकरीत कार्यरत झाले. मात्र, समाजप्रेम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी मुंबईतील स्थैर्य सोडले आणि गावी परत येऊन सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. गरजूंच्या अडचणी सोडवणे, लोकांच्या मदतीला तत्पर राहणे आणि अन्यायाविरुद्ध लढा देणे, हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनले. या कार्यातूनच त्यांचा परिचय कराड दक्षिणचे माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्याशी झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारणात निष्ठेने योगदान दिले. प्रामाणिकपणा, लोकसंपर्क आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर नानांनी समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. राजकीय जबाबदाऱ्या पार ...

घोगांव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. मीनाक्षी महादेव साळुंखे यांची निवड.

Image
  घोगांव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. मीनाक्षी महादेव साळुंखे यांची निवड. उंडाळे -प्रतिनिधी. घोगांव ता.कराड येथील  सरपंच सौं.पाटील यांनी गेल्या महिन्यात दिलेल्या राजिनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या सरपंच निवडीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने सौं. मीनाक्षी साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आली होती या मध्ये ५ विरुद्ध ४ मतांनी विजयी झाल्या.मा. अतुलजी भोसले बाबा हे प्रथमच आमदार झाल्या नंतर कराड दक्षिण मधून बाबा समर्थक उमेदवार विजय झाला.विजयी उमेदवार आणि सर्व सदस्य यांनी ग्रामदैवत बाळसिद्ध नाथाचे दर्शन घेतले त्यावेळी आपण गावाच्या पूर्ण विकासासाठी मा. अतुलजी भोसले यांचे मार्गदर्शनाखाली काम करू असा आत्मविश्वासाने आपल्या भावना व्यक्त केल्या.यामध्ये सदस्य सौं. सुनंदा भावके, सौं.मंगल धुळप,सुरेखा साळुंखे, मानाजी माने ग्रामपंचायत सदस्य यांचा सिहंचा वाटा होता. भाजपा चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हिरीरीने प्रयत्न केले.मार्गदर्शक उद्योजक मोहनरावजी नायकवाडी, जयप्रकाश माने यांनी विशेष प्रयत्न केले. सोबत शिवाजी नगर, साई नगर,संपूर्ण घोगांव कर ग्राम...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये नुकतीच पालक सभा उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पालकांच्या निदर्शनास आणून देणे तसेच विद्यार्थी व पालक यांच्या समस्या सोडवणे या उद्देशाने या पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी पालकांना महाविद्यालयात झालेल्या परीक्षांमधील गुण सांगून आमचे ध्येय शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट आणि सामाजिकरित्या औषध निर्माण शास्त्राचे संगोपन करणे हे असून त्यानुसार आम्ही पुढच्या शिक्षणाची तयारी करून घेत असतो तसेच कॅम्पस ड्राईव्हमधून प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते असे सांगितले. ज्यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांची व्यवस्थित सांगड असेल तरच तो विद्यार्थी चांगला घडला जातो म्हणूनच पालकांनी प्रत्येक पालक मिटींगला उपस्थित राहिलात तरच आपल्या पाल्याची शैक्षणिक स्थिती काय आहे हे समजेल तुमच्या शंका व प्रश्नांचे निराकरण ...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे कल्पना भाटवाडकर यांचे प्रोडक्शन, पॅकेजिंग अँड क्वालिटी कंट्रोल इन फार्मास्युटिकल्स विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  सध्या त्या सिरमॅक्सो केमिकल्स प्रा.लि.च्या एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून  काम पाहत आहेत.  त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना फार्मा इंडस्ट्रीबद्दल माहिती देताना औषधे कशी तयार होतात, तयार झालेल्या औषधांचे पॅकेजिंग कसे करायचे आणि त्याची क्वालिटी कशी ठेवायची याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. पूजा भोसले यांनी मानले.

खेड तालुका शिराळा येथील भारतीय दलित महासंघाच्या आंदोलनाला यश.

Image
  खेड तालुका शिराळा येथील भारतीय दलित महासंघाच्या आंदोलनाला यश. शिराळा -प्रतिनिधी. खेड तालुका शिराळा येथील औद्योगिक कंपन्यातून कुंभारकी तलावामध्ये येणाऱ्या रसायन युक्त दूषित पाण्यामुळे खेड गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा, जनावरांच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. जिल्हाध्यक्ष दयानंद शिवजातक यांनी तहसीलदार शामला खोत पाटील यांना दिलेल्या निवेदनानुसार दि.१०/२/२०२५ रोजी भारतीय दलित महासंघाने खेड येथील कुंभारकी तलावात संबंधित औद्योगिक कंपन्यावर कारवाई करण्यासंदर्भात जलसमाधी आंदोलन सुरू केले. त्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सदरच्या जलसमाधी आंदोलन स्थळी भेट देऊन संबंधित कंपन्यावर कारवाईचे लेखी आदेश दिले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईच्या लेखी आदेशानंतर भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी आंदोलन स्थगित केले.  सदरच्या आंदोलनादरम्यान शिराळा पोलीस स्टेशनचा मोठा फौज फाटा खेड या ठिकाणी बंदोबस्त साठी ठेवण्यात आला होता. खेड ग्रामस्थांनी भारतीय दलित महासंघाच्या आंदोलकांचे गावाला न...

आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्यातर्फे आकाईचीवाडी येथे आरोग्य शिबीर संपन्न.

Image
      आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्यातर्फे आकाईचीवाडी  येथे आरोग्य शिबीर संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी.   महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या सहकार्यातून कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा.डॉ.श्री.अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकारातून मौजे आकाईचीवाडी,ता. कराड येथील  महादेव मंदिर येथे बांधकाम कामगार  व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना 2 लाख रु. पर्यंत दवाखान्यातील सर्व बिल माफ होणार आहे. त्याचे आरोग्य शिबिर, रक्त तपासणी करण्यात आली व  सर्वांना आरोग्य कार्ड वितरित करण्यात येणार आहेत. त्याचा आरोग्य कॅम्प आकाईचीवाडी येथे संपन्न झाला. यावेळी भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील, भाजपा कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.दादासो उमराणी, येळगाव झेडपी समन्वयक श्री.सचिन साळुंखे, श्री.सागर पाटील, श्री.अजित पाटील, श्री.अधिक कापसे, श्री.मोहन चिकले, श्री.अजिंक्य शेवाळे व गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे राजेंद्र पडाळकर यांचे द रोल ऑफ फार्मसी इन शेपिंग हेल्थ केअर फ्युचर या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  सध्या ते रेप्युटेड ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे मार्केटिंग प्रमुख म्हणून  काम पाहत आहेत.  त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्राचे महत्त्व सांगून या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. पूजा भोसले यांनी मानले.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमावेळी माजी विद्यार्थी राहुल बनकर (ऑफिसर रेग्युलेटरी अफेअर्स, वरोली,मुंबई) व अनिल काळे (एरिया मॅनेजर ॲट अलेंबिक फार्मास्युटिकल सोलापूर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी विद्यार्थी राहुल बनकर, अनिल काळे, सानिका कदम, नितीन शेडगे, प्रणाली यादव, पल्लवी थोरात या विद्यार्थ्यांनी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्या ते काम करत असलेल्या क्षेत्राविषयी व कार्याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले व महाविद्यालयात शिक्षण घेत असताना स्वतःचे घडलेले महाविद्यालयातील अनुभव सांगीतले.  यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी काळाबरोबर बदल करणे हे खूप गरजेचे असल्याचे सांगून जुन्या गोष्टींना उजाळा ...

मराठी भाषेला साहित्याचा समृद्ध वारसा आहे.

Image
  मराठी भाषेला साहित्याचा समृद्ध वारसा आहे. ____उजेडवातीकार गुलाब मोहिते. शिराळा - प्रतिनिधी. मराठी भाषा ही सर्व साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे तो मराठी भाषेचा वारसा आपण जपला पाहिजे त्यासाठी वाचनाची आवड समाजामध्ये निर्माण करण्यासाठी साहित्यीकांनी लोकांपर्यंत गेले पाहिजे असे प्रतिपादन उजेडवातीकार गुलाब मोहिते यांनी केले.बाबा नाईक महाविद्यालय कोकरूडच्या वतीने मांगरूळ मध्ये श्रमसंस्कार शिबीरात आयोजित 'मातीतल्या कविता ' या कार्यक्रमात ते प्रमूख पाहुणे म्हणून बोलत होते. वाचनापासून दुरावलेल्या पिढीला पुन्हा वाचनाकडे वळवावी लागेल असेही ते म्हणाले.यावेळी प्रा.डाॅ.विनायक‌ भागवत प्रा.संगिता जावरकर उपस्थित होते.या कार्यक्रमात प्रा.डॉ.अनिल काटे,श्री भगवान पाटील, श्री संजय नायकवडी, श्री भीमराव कुंभार, श्री संजय पोळ, डॉ.विठ्ठल वडाम, श्री जितेंद्र लोकरे,प्रा.सचिन चव्हाण, पल्लवी लोहार, सानिका पिसे यांनी कविता सादर केल्या.‌सूत्रसंचलन प्रा.संजीवनी कांबळे यांनी केले.अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री मस्के सर होते.‌ आभार प्रा.डाॅ.सचिन मरळे यांनी मानले.