महिला महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.
महिला महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.
"नवीन शैक्षणिक धोरणाची वाणिज्य शिक्षणातील भूमिका" या विषयावर प्रा. डॉ. राजेशकुमार चेतीवाल यांनी केलं मार्गदर्शन.
शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड व अग्रणी महाविद्यालय बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने "नवीन शैक्षणिक धोरणाची वाणिज्य शिक्षणातील भूमिका" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा महिला महाविद्यालय कराड येथे संपन्न झाली.या कार्यशाळेसाठी मा. प्रा. डॉ. राजेशकुमार चेतीवाल, वाणिज्य विभागप्रमुख कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. स्नेहल प्रभुणे या होत्या. प्रा. डॉ. राजेशकुमार चेतीवाल यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची वाणिज्य शिक्षणातील भूमिका मांडताना या धोरणामुळे भविष्यात होणारे बदल तसेच येऊ घातलेल्या स्किल आधारित कोर्सची माहिती सांगितली. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या प्रो. डॉ. स्नेहल प्रभुणे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा कौशल्य विकासासाठी कसा उपयोग करून घ्यावा याविषयी थोडक्यात. माहिती सांगितली.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य मा. डॉ. पराग सोनटक्के व प्रो. डॉ. उज्वला ताठे, समन्वयक अग्रणी महाविद्यालय योजना यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किशोर गुजर व सूत्रसंचालन डॉ. ज्योती मोहोळकर यांनी केलं. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. वैशाली काटकर व आभार प्रदर्शन प्रा. दिपाली शिंदे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, बी.कॉम. व बी.कॉम. (IT) च्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.



Comments
Post a Comment