कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमावेळी माजी विद्यार्थी राहुल बनकर (ऑफिसर रेग्युलेटरी अफेअर्स, वरोली,मुंबई) व अनिल काळे (एरिया मॅनेजर ॲट अलेंबिक फार्मास्युटिकल सोलापूर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी विद्यार्थी राहुल बनकर, अनिल काळे, सानिका कदम, नितीन शेडगे, प्रणाली यादव, पल्लवी थोरात या विद्यार्थ्यांनी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्या ते काम करत असलेल्या क्षेत्राविषयी व कार्याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले व महाविद्यालयात शिक्षण घेत असताना स्वतःचे घडलेले महाविद्यालयातील अनुभव सांगीतले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी काळाबरोबर बदल करणे हे खूप गरजेचे असल्याचे सांगून जुन्या गोष्टींना उजाळा देत या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेबद्दल जी भावनिक गुंतवणूक ठेवलेली आहे ती प्रेरणादायी असल्याचे सांगितले तसेच सध्या काही विद्यार्थी फार्मसी क्षेत्रात मोठ्या पदावरती काम करत आहेत अशा विद्यार्थ्यांची महाविद्यालयाला जेव्हा गरज असते अशावेळी ते विद्यार्थी मदत करत असतात असे सांगितले व या संस्थेचे नाव असेच मोठे करण्याचे आव्हान केले.
यावेळी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व आम्ही चांगले विद्यार्थी घडविण्याचे एक स्वप्न पाहिले होते ते सत्यात उतरताना दिसत असल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत असल्याचे सांगितले. तसेच सध्या सर्व संस्थेच्या विभागामध्ये एकूण १७०० मुले शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमावेळी प्राचार्या वैशाली पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहुल बनकर व अनिल काळे तसेच संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांचे स्वागत केले. तर सूत्रसंचालन प्रा. पूजा भोसले यांनी व आभार प्रा. प्रियांका माळी यांनी मानले. या कार्यक्रमावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment