दयाराम काळुखे (नाना) – एक समाजनिष्ठ कार्यकर्ता हरपला.
दयाराम काळुखे (नाना) – एक समाजनिष्ठ कार्यकर्ता हरपला.
गोंडवाना न्यूज वृत्तसेवा:-
चचेगावचे ज्येष्ठ नागरिक, कराड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक आणि रयत संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते श्री. दयाराम काळुखे (नाना) यांच्या दुःखद निधनाने सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
घरची परिस्थिती हालाखीची असताना त्यांनी जिद्दीने शिक्षण घेतले आणि आर्थिक सुबत्तेसाठी मुंबईत चांगल्या नोकरीत कार्यरत झाले. मात्र, समाजप्रेम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी मुंबईतील स्थैर्य सोडले आणि गावी परत येऊन सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. गरजूंच्या अडचणी सोडवणे, लोकांच्या मदतीला तत्पर राहणे आणि अन्यायाविरुद्ध लढा देणे, हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनले.
या कार्यातूनच त्यांचा परिचय कराड दक्षिणचे माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्याशी झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारणात निष्ठेने योगदान दिले. प्रामाणिकपणा, लोकसंपर्क आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर नानांनी समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. राजकीय जबाबदाऱ्या पार पाडतानाच आंबेडकरी चळवळीतील धार्मिक, सामाजिक आणि वैचारिक कार्यातही ते अग्रस्थानी राहिले.
नानांचे अचानक निधन कराड दक्षिण काँग्रेससाठी तसेच आंबेडकरी चळवळीसाठी मोठी हानी आहे.अशा या निष्ठावान कार्यकर्त्याच्या चरणी.
भावपूर्ण श्रद्धांजली!


Comments
Post a Comment