कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री. संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे शैलेश झेंडे यांचे अंडरस्टँडिंग द फार्मासुटिकल बिजनेस लँडस्केप इन एशिया या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या ते मेघा लाइफ सायन्स, इंडोनेशिया कंपनीमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना प्राचीन काळापासून औषधाचा शोध कसा लागला उदाहरणार्थ पेनिसिलीन, इन्सुलिन कोविड लस तसेच उच्च प्रतीचे ड्रग जेनेरिक ड्रग, ओव्हर द काउंटर ड्रग इत्यादी औषधाबद्दल माहिती दिली.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. मोनिका शिंदे यांनी मानले.


Comments
Post a Comment