कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

उंडाळे -प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे कल्पना भाटवाडकर यांचे प्रोडक्शन, पॅकेजिंग अँड क्वालिटी कंट्रोल इन फार्मास्युटिकल्स विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या त्या सिरमॅक्सो केमिकल्स प्रा.लि.च्या एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून  काम पाहत आहेत. 

त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना फार्मा इंडस्ट्रीबद्दल माहिती देताना औषधे कशी तयार होतात, तयार झालेल्या औषधांचे पॅकेजिंग कसे करायचे आणि त्याची क्वालिटी कशी ठेवायची याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. पूजा भोसले यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .