घोगांव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. मीनाक्षी महादेव साळुंखे यांची निवड.

 घोगांव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. मीनाक्षी महादेव साळुंखे यांची निवड.

उंडाळे -प्रतिनिधी.

घोगांव ता.कराड येथील  सरपंच सौं.पाटील यांनी गेल्या महिन्यात दिलेल्या राजिनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या सरपंच निवडीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने सौं. मीनाक्षी साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आली होती या मध्ये ५ विरुद्ध ४ मतांनी विजयी झाल्या.मा. अतुलजी भोसले बाबा हे प्रथमच आमदार झाल्या नंतर कराड दक्षिण मधून बाबा समर्थक उमेदवार विजय झाला.विजयी उमेदवार आणि सर्व सदस्य यांनी ग्रामदैवत बाळसिद्ध नाथाचे दर्शन घेतले त्यावेळी आपण गावाच्या पूर्ण विकासासाठी मा. अतुलजी भोसले यांचे मार्गदर्शनाखाली काम करू असा आत्मविश्वासाने आपल्या भावना व्यक्त केल्या.यामध्ये सदस्य सौं. सुनंदा भावके, सौं.मंगल धुळप,सुरेखा साळुंखे, मानाजी माने ग्रामपंचायत सदस्य यांचा सिहंचा वाटा होता. भाजपा चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हिरीरीने प्रयत्न केले.मार्गदर्शक उद्योजक मोहनरावजी नायकवाडी, जयप्रकाश माने यांनी विशेष प्रयत्न केले. सोबत शिवाजी नगर, साई नगर,संपूर्ण घोगांव कर ग्रामस्थ यांनी खूपच सहकार्य आणि शांततेचे सहकार्य करून निवड पार पाडली.सागर भावके, संतोष शिंदे, नितीन साळुंखे, कृष्णदेव साळुंखे, पोपट साळुंखे, संदीप भावके, संदीप भेदाटे, राहुल साळुंखे,बाजीराव भावके, सर्व तरुण, व्रद्ध कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .