आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्यातर्फे आकाईचीवाडी येथे आरोग्य शिबीर संपन्न.
आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्यातर्फे आकाईचीवाडी येथे आरोग्य शिबीर संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या सहकार्यातून कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा.डॉ.श्री.अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकारातून मौजे आकाईचीवाडी,ता. कराड येथील महादेव मंदिर येथे बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना 2 लाख रु. पर्यंत दवाखान्यातील सर्व बिल माफ होणार आहे. त्याचे आरोग्य शिबिर, रक्त तपासणी करण्यात आली व सर्वांना आरोग्य कार्ड वितरित करण्यात येणार आहेत. त्याचा आरोग्य कॅम्प आकाईचीवाडी येथे संपन्न झाला. यावेळी भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील, भाजपा कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.दादासो उमराणी, येळगाव झेडपी समन्वयक श्री.सचिन साळुंखे, श्री.सागर पाटील, श्री.अजित पाटील, श्री.अधिक कापसे, श्री.मोहन चिकले, श्री.अजिंक्य शेवाळे व गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments
Post a Comment