कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न.


उंडाळे -प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये नुकतीच पालक सभा उत्साहात संपन्न झाली.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पालकांच्या निदर्शनास आणून देणे तसेच विद्यार्थी व पालक यांच्या समस्या सोडवणे या उद्देशाने या पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी पालकांना महाविद्यालयात झालेल्या परीक्षांमधील गुण सांगून आमचे ध्येय शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट आणि सामाजिकरित्या औषध निर्माण शास्त्राचे संगोपन करणे हे असून त्यानुसार आम्ही पुढच्या शिक्षणाची तयारी करून घेत असतो तसेच कॅम्पस ड्राईव्हमधून प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते असे सांगितले. ज्यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांची व्यवस्थित सांगड असेल तरच तो विद्यार्थी चांगला घडला जातो म्हणूनच पालकांनी प्रत्येक पालक मिटींगला उपस्थित राहिलात तरच आपल्या पाल्याची शैक्षणिक स्थिती काय आहे हे समजेल तुमच्या शंका व प्रश्नांचे निराकरण करता येईल असे सांगितले. या कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. जयश्री जगदाळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .