मराठी भाषेला साहित्याचा समृद्ध वारसा आहे.

 मराठी भाषेला साहित्याचा समृद्ध वारसा आहे.____उजेडवातीकार गुलाब मोहिते.

शिराळा - प्रतिनिधी.

मराठी भाषा ही सर्व साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे तो मराठी भाषेचा वारसा आपण जपला पाहिजे त्यासाठी वाचनाची आवड समाजामध्ये निर्माण करण्यासाठी साहित्यीकांनी लोकांपर्यंत गेले पाहिजे असे प्रतिपादन उजेडवातीकार गुलाब मोहिते यांनी केले.बाबा नाईक महाविद्यालय कोकरूडच्या वतीने मांगरूळ मध्ये श्रमसंस्कार शिबीरात आयोजित 'मातीतल्या कविता ' या कार्यक्रमात ते प्रमूख पाहुणे म्हणून बोलत होते. वाचनापासून दुरावलेल्या पिढीला पुन्हा वाचनाकडे वळवावी लागेल असेही ते म्हणाले.यावेळी प्रा.डाॅ.विनायक‌ भागवत प्रा.संगिता जावरकर उपस्थित होते.या कार्यक्रमात प्रा.डॉ.अनिल काटे,श्री भगवान पाटील, श्री संजय नायकवडी, श्री भीमराव कुंभार, श्री संजय पोळ, डॉ.विठ्ठल वडाम, श्री जितेंद्र लोकरे,प्रा.सचिन चव्हाण, पल्लवी लोहार, सानिका पिसे यांनी कविता सादर केल्या.‌सूत्रसंचलन प्रा.संजीवनी कांबळे यांनी केले.अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री मस्के सर होते.‌ आभार प्रा.डाॅ.सचिन मरळे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .