खेड तालुका शिराळा येथील भारतीय दलित महासंघाच्या आंदोलनाला यश.
खेड तालुका शिराळा येथील भारतीय दलित महासंघाच्या आंदोलनाला यश.
शिराळा -प्रतिनिधी.
खेड तालुका शिराळा येथील औद्योगिक कंपन्यातून कुंभारकी तलावामध्ये येणाऱ्या रसायन युक्त दूषित पाण्यामुळे खेड गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा, जनावरांच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. जिल्हाध्यक्ष दयानंद शिवजातक यांनी तहसीलदार शामला खोत पाटील यांना दिलेल्या निवेदनानुसार दि.१०/२/२०२५ रोजी भारतीय दलित महासंघाने खेड येथील कुंभारकी तलावात संबंधित औद्योगिक कंपन्यावर कारवाई करण्यासंदर्भात जलसमाधी आंदोलन सुरू केले. त्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सदरच्या जलसमाधी आंदोलन स्थळी भेट देऊन संबंधित कंपन्यावर कारवाईचे लेखी आदेश दिले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईच्या लेखी आदेशानंतर भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी आंदोलन स्थगित केले.
सदरच्या आंदोलनादरम्यान शिराळा पोलीस स्टेशनचा मोठा फौज फाटा खेड या ठिकाणी बंदोबस्त साठी ठेवण्यात आला होता. खेड ग्रामस्थांनी भारतीय दलित महासंघाच्या आंदोलकांचे गावाला न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार मानले. सदरच्या आंदोलना दरम्यान भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष दयानंद शिवजातक, प. म. अध्यक्ष दिलीप मोरे, उपाध्यक्ष प्रकाश महापुरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आढाव, तालुका उपाध्यक्ष अमोल बडेकर,सविता सातपुते, रोहित महिंद, मारुती सातपुते, सारिका घोलप, सविता सातपुते, संतोष मोरे, सुनील घोलप, सतीश काळे, सुरेश कांबळे, शरद कांबळे, सुरेश मोहिते, शंकर लोखंडे, लक्ष्मण घोलप, दयानंद कांबळे, आकाश कांबळे, प्रताप पाटील, दिग्विजय पाटील, सुनील पाटील, व भारतीय दलित महासंघाचे बहुसंख्य कार्यकर्ते व खेडचे ग्रामस्थ उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



Comments
Post a Comment