Posts

Showing posts from October, 2022

येवती गावचे सुपुत्र अरुण शेवाळे यांचे निधन.

Image
      येवती गावचे सुपुत्र  अरुण शेवाळे यांचे निधन.  कराड - प्रतिनिधी.  अरुण शेवाळे यांचे निधन येवती गावचे सुपुत्र कैलासवासी अरुण खाशाबा शेवाळे यांचे वयाच्या ६० व्या वर्षी मुंबई या ठिकाणी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई  ,पत्नी ,दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ ,दोन बहिणी, असा परिवार आहे.अरुण शेवाळे उर्फ भाऊ हे हसतमुख असणारे व्यक्तिमत्वाचे   निधन झाल्याने येवती गावावर शोककळा पसरली आहे .

उंडाळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ. शोभा मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड.

Image
उंडाळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ. शोभा मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड.   उंडाळे - प्रतिनिधी.  कराड दक्षिण मधील  राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या उंडाळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ.शोभा मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  सर्व सदस्यांना सत्तेची संधी मिळावी या उद्देशाने ॲड. उदयसिंह पाटील  यांनी सौ. शोभा मधुकर शिंदे यांना उपसरपंच पदाची संधी दिली.विद्यमान उपसरपंच श्री. बापूराव पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर सौ. शोभा मधुकर शिंदे यांची उपसरपंच पदाची संधी  मिळाली. त्या  ॲड उदयसिंह पाटील गटाचे समर्थक आहेत. या  निवडीनंतर रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील दादा यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी ग्रामसेवक शरद चव्हाण, सरपंच संगीता माळी, ग्रामपंचायत सदस्य दादासो पाटील, अजित कदम, गणेश पाटील ,बापूराव पाटील, संगीता पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी, घोगावं येथे ताण तणाव या विषयावरती व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी, घोगावं येथे  ताण तणाव या विषयावरती व्याख्यान संपन्न. कराड - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्मसी) घोगाव येथे कृष्णा इन्स्टिट्यूट मानसोपचार ऑफ सायन्स  विभागाच्या मार्गदर्शक सौ वैशाली यादव मॅडम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  त्यांनी विद्यार्थ्यांना मानसिक ताण याविषयी मार्गदर्शन करताना ताण म्हणजे काय, ताण असावा की नसावा, ताणाची लक्षणे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच याच वयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात  बदल होत असतो त्यामुळे ताण येऊ नये यासाठी नियमित व्यायाम करावा ज्यामुळे मेंदूतील रसायन आपणाला तणावापासून दूर ठेवते असा संदेश दिला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी सौ वैशाली यादव मॅडम यांचे स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन  केतकी शिंदे मॅडम यांनी केले .

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड. कराड - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड अपोलोच्या फार्मसी विभागात  करण्यात आली. त्यामध्ये तुषार नलवडे, मयूर जाधव, निलेश कदम, योगेश मोरे, रोहन भाडुगडे, प्रतीक आचरे, रूपाली मराठे, वैष्णवी भोसले, कृष्णा मुंढे, स्वप्नजा मोहिते, अनिकेत मोहिते, श्रुतिका नाले, तेजश्री शिंदे, शुभांगी पाटील, रूपाली पाटील, प्राची शेवाळे, सुप्रिया धुळप, नेहा मस्के, ऐश्वर्या माने या  विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्या  या निवडी करण्यासाठी अपोलोच्या कार्यकारी एच आर मंगल पाटील, कार्यकारी संचालक श्री राहुल कोढलकर,  संतोष पालसकर  हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना सौ मंगल पाटील यांनी मार्गदर्शन केले व अपोलो विषयी माहिती दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉ. उषा जोहरी मॅडम, सचिव श्री प्रसून जोहरी सर, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

माजी शिक्षण विस्तार अधिकारी तानाजी शेवाळे गुरूजी यांचे निधन.

Image
  माजी शिक्षण विस्तार अधिकारी तानाजी शेवाळे गुरूजी यांचे निधन.  कराड - प्रतिनिधी. येवती ता.कराड येथील,सुपुञ ,जिंती शाळेचे  माजी  मुख्याध्यापक, उंडाळे बीट चे  माजी शिक्षण विस्तार अधिकारी , शिवतेज सामाजिक विकास संस्था येवती चे आधारस्तंभ तानाजी गणपती शेवाळे गुरुजी यांचे अल्पशा आजाराने सोमवार  दि.१७/१०/२०२२ रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात आई ,पत्नी, भाऊ ,१ मुलगा, १मुलगी ,सुन ,भावजयी असा मोठा परिवार आहे .रक्षाविसर्जन बुधवार दि.१९/१०/२०२२ रोजी येवती येथे होणार आहे.

संतकृपा महाविद्यालयात 'महाराष्ट्र माझा' काव्य संग्रहाचे प्रकाशन व वितरण सोहळा संपन्न.

Image
  संतकृपा महाविद्यालयात 'महाराष्ट्र माझा' काव्य संग्रहाचे प्रकाशन व वितरण सोहळा  संपन्न. कराड - प्रतिनिधी. घोगाव ता.कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था घोगांव संचलित श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी,घोगांव या महाविद्यालयात महाराष्ट्र माझा हा काव्य संग्रहाचे प्रकाशन व वितरण समारंभ पूर्वक करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य डॉ. अरलेलीमठ होते. तर तृतीय वर्षात शिकत असलेले विद्यार्थी कवी विजय पवार प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. अरलेलीमठ म्हणाले, फार्मसी क्षेत्र आणि कविता या दोन विभिन्न गोष्टींची उत्तम सांगड विजय पवार यांनी घातली आहे. त्याला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.  कवी विजय पवार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले. आपण कसे घडलो. यासाठी काय केले. कोणत्या लोकांच्या संगतीत आलो. जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्या आई वडीलांनी केलेला संघर्ष नेहमी डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केली पाहिजे. आपली उठबस आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या व्यक्तींबरोबर असली...

येवती येथे आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न .

Image
  येवती येथे आरोग्य शिबिर  उत्साहात संपन्न . उंडाळे - प्रतिनिधी. येवती तालुका कराड येथे पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र येवती आणि कृष्णा हॉस्पिटल कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग  निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास प्रचंड असा प्रतिसाद मिळाला .या शिबिराचे उद्घाटन सरपंच सागर शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले . या वेऴी कराडच्या गटविकास अधिकारी साळुंखे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती .यावेळी त्या बोलताना म्हणाल्या  की पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसा दिनी हा राबवलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. येवती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटल चे  वैद्यकीय पथकातील डॉक्टर यांनी हे शिबिर उत्तम रित्या पार पाडले .या शिबिरास अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी नितीन मोरे,अतुल काकडे,संजय पाटील ,विकास कांबळे,बाळकृष्ण कुंभार ,प्रताप भणगे ,भैरवनाथ दुध डेअरी च्या चेअरमन रेखा शेवाळे, येवती ग्रामपंचायतीचे ...

मा.ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन.

Image
  मा.ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत  सर्व रोग निदान  शिबीराचे आयोजन. कराड - प्र तिनिधी. पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत  सर्व रोग निदान  शिबीर . येवती तालुका कराड येथे आयोजित केले आहे.अखिल  भारतीय ग्रामीण पत्रकार  संघाचे सचिव   ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त  कृष्णा हॉस्पिटल   यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान शिबीर  सोमवार दिनांक   १० ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळी १० ते १ या वेऴेत   आयोजित करण्यात आले आहे, या शिबिरामध्ये जनरल मेडिसिन तज्ञ , शस्त्रक्रिया तज्ञ, दंतचिकित्सा तज्ञ ,बालरोग तज्ञ ,स्त्री रोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, आदी तपासण्या करून मोफत औषधे दिली जाणार आहेत, सदर मोफत शिबिराचा लाभ गावातील नागरिकांनी व परिसरातील नागरिकांनी घ्यावा.  सर्वरोग निदान शिबिर येवती  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये घेण्यात येणार आहे .या या शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरेंद्र माळी कृष्णा हॉस्पिटल  चे  नामवंत डॉक्टर उपस्थित राहणार आहेत .जन...

येवती येथे धम्म ध्वजा रोहन व चबुतऱ्याचे उद्घाटन उत्साहात साजरे.

Image
  येवती येथे धम्म ध्वजा रोहन व चबुतऱ्याचे उद्घाटन उत्साहात साजरे. उंडाळे - प्रतिनिधी. येवती तालुका कराड येथे बौद्धजन हितवर्धक संघ येवती मुंबई ,यांच्या वतीने 66 व्या धम्म परिवर्तन दिनाच्या निमित्ताने धम्म ध्वजारोहण सोहळा आणि  चबुतऱ्याचे उद्घाटन उसात साजरे झाले. याचे उद्घाटन राजेंद्र सोरटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाराष्ट्र पुरोगामी संघर्ष संघटनेचे सुभाष वायदंडे ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव ज्ञानेश्वर शेवाळे ,तरुण भारतचे पत्रकार आकाश सोरटे, येवतीचे उपसरपंच सविनय सोरटे, समाधान सोरटे ,कैलास सोरटे ,बौद्धजन हितवर्धक संघाचे सर्व पदाधिकारी, उपासक ,उपासिका, उपस्थित होते. यावेळी बोलताना वायदंडे म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचण्याचे काम आपण केले पाहिजे. आज चबुतऱ्यासाठी ज्यांनी जागा दान दिली ते राजेंद्र सोरटे यांचे मनापासून धन्यवाद जागा दान देण्यासाठी पण मोठे मन लागतं असे त्यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमास दत्ता कांबळे ,अमित कांबळे ,यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .जागा दान दिल्याबद्दल बौद्धजन हितवर्धक संघ येवती मुंबई यांच्या...

गरबा खेळताना तरुणावर काळाचा घाला

Image
  गरबा खेळताना तरुणावर काळाचा घाला.   कराड    -  प्रतिनिधी.   राज्यभरात सर्वत्र गरबा उत्सवाची धूम चालली असताना दु:खद वृत्त समोर आलं आहे.  वावोशी (खोपोली) येथील एका नवरात्र उत्सवात गरबा खेळत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यश सुभाष देशमुख   असं या तरुणाचं नाव आहे. मूळचा साळशि रंबे येथील परंतु कामानिमित्त खोपोली येथे राहणाऱ्या  यशचा मृत्यू झाल्यामुळे ऐन उत्सवात साळशिरंबे व परिसरात  शोककळा पसरली आहे. यश आपल्या आई-वडिलांसोबत वावोशी येथे राहत होता.12 वी पास झाल्यानंतर तो आपल्या वडिलांना कुटुंबासाठी मदत व्हावी म्हणून कंपनीत काम करत होता. आई-वडिलांचा आधार होता. यश  हा खोपोली येथील एका खाजगी कंपनीत काम करत होता.ऐन 17वर्ष वयातच त्याच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर यशाच्या मृत्यूने साळशिरंबे परिसरात शोककळा परसली आहे.

मिशन धाराऊ व राष्ट्रीय शालेय पोषण अंतर्गत साळशिरंबे अंगणवाडी येथे सुढृड बालक स्पर्धा .

Image
  मिशन धाराऊ व राष्ट्रीय शालेय पोषण अंतर्गत साळशिरंबे अंगणवाडी येथे सुढृड बालक स्पर्धा. उंडाळे - प्रतिनिधी. दिनांक 1 ऑगस्ट 30 सप्टेंबर या कलावधीत मिशन धाराऊ अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.याच उपक्रमांतर्गत अंगणवाडी साळशिरंबे ता.कराड येथे सुढृड बालक स्पर्धा आयोजित करण्यात आली .  या कार्यक्रमास मौजे साळशिरंबेच्या ग्रामपंचायत सदस्या सौ. स्मिता देशमुख यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली, या स्पर्धा प्रत्येक अंगणवाडी मधून 3ते6 व 3 ते 5 या वयोगटातील लाभार्थीची निवड करण्यात आली.ग्रा.प.सदस्या यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.बालकांचा महिन्याचा वाढता वजन दर या मध्ये श्रेणी ठरवलेली असते तर अंगणवाडीतील त्यांची उपस्थिती ,आहार ,लसीकरण,टी एच आर व वैयक्तिक स्वछता या गोष्टींची पडताळणी करून निकषानुसार पात्र या पात्र बालकांच्या मधून विजेता निवड करण्यात आली .   या कार्यक्रमास साळशिरंबे येथील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस , सर्व पालक , ग्रा.प.सदस्य उपस्थित होते .         या कार्यक्रमाचे नियोजन साळशिरंबे येथील सर्व अंगणवाडी सेविका,...

मिशन धाराऊ व राष्ट्रीय शालेय पोषण अंतर्गत आकाईवाडी अंगणवाडी येथे सुढृड बालक स्पर्धा.

Image
  मिशन धाराऊ व राष्ट्रीय शालेय पोषण अंतर्गत आकाईवाडी अंगणवाडी येथे सुढृड बालक स्पर्धा. कराड - प्रतिनिधी. दिनांक 1 ऑगस्ट 30 सप्टेंबर या कलावधीत महिला बालकल्याण जि.प.सातारा या विभागामार्फत मिशन धाराऊ उपक्रम राबविण्यात आले होते.याच उपक्रमांतर्गत अंगणवाडी आकाईवाडी ता.कराड (शेवाळेवाडी,बोत्रेवाडी) येथे सुढृड बालक स्पर्धा आयोजित करण्यात आली .  या कार्यक्रमास मौजे आकाईवाडी  ग्रामपंचायत सरपंच  श्री.महादेव वाळके व पर्यवेक्षिका श्रीमती विद्या चव्हाण मॅडम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली, या स्पर्धा प्रत्येक अंगणवाडी मधून 3ते6 व 3 ते 5 या वयोगटातील लाभार्थीची निवड करण्यात आली. सरपंच  श्री.महादेव वाळके यांच्या हस्ते वक्षिस वितरण करण्यात आले.बालकांचा महिन्याचा वाढता वजन दर या मध्ये श्रेणी ठरवलेली असते तर अंगणवाडीतील त्यांची उपस्थिती ,आहार ,लसीकरण,टी एच आर व वैयक्तिक स्वछता या गोष्टींची पडताळणी करून निकषानुसार पात्र बालकांच्या मधून विजेता निवड करण्यात आली .   या कार्यक्रमास  आकाईवाडी, शेवाळेवाडी,बोत्रेवाडी येथील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस , सर्व पालक , ग्रा.प.सदस्...