मिशन धाराऊ व राष्ट्रीय शालेय पोषण अंतर्गत आकाईवाडी अंगणवाडी येथे सुढृड बालक स्पर्धा.
मिशन धाराऊ व राष्ट्रीय शालेय पोषण अंतर्गत आकाईवाडी अंगणवाडी येथे सुढृड बालक स्पर्धा.
कराड - प्रतिनिधी.
दिनांक 1 ऑगस्ट 30 सप्टेंबर या कलावधीत महिला बालकल्याण जि.प.सातारा या विभागामार्फत मिशन धाराऊ उपक्रम राबविण्यात आले होते.याच उपक्रमांतर्गत अंगणवाडी आकाईवाडी ता.कराड (शेवाळेवाडी,बोत्रेवाडी) येथे सुढृड बालक स्पर्धा आयोजित करण्यात आली .
या कार्यक्रमास मौजे आकाईवाडी ग्रामपंचायत सरपंच श्री.महादेव वाळके व पर्यवेक्षिका श्रीमती विद्या चव्हाण मॅडम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली, या स्पर्धा प्रत्येक अंगणवाडी मधून 3ते6 व 3 ते 5 या वयोगटातील लाभार्थीची निवड करण्यात आली. सरपंच श्री.महादेव वाळके यांच्या हस्ते वक्षिस वितरण करण्यात आले.बालकांचा महिन्याचा वाढता वजन दर या मध्ये श्रेणी ठरवलेली असते तर अंगणवाडीतील त्यांची उपस्थिती ,आहार ,लसीकरण,टी एच आर व वैयक्तिक स्वछता या गोष्टींची पडताळणी करून निकषानुसार पात्र बालकांच्या मधून विजेता निवड करण्यात आली .
या कार्यक्रमास आकाईवाडी, शेवाळेवाडी,बोत्रेवाडी येथील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस , सर्व पालक , ग्रा.प.सदस्य उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे नियोजन आकाईवाडी, शेवाळेवाडी,बोत्रेवाडी येथील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस यांनी उत्तमरित्या केले , सर्व अंगणवाडीतील बालकांना खाऊचे वाटप करून स्पर्धेची सांगता झाली .

Comments
Post a Comment