येवती येथे आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न .

 येवती येथे आरोग्य शिबिर  उत्साहात संपन्न .

उंडाळे - प्रतिनिधी.

येवती तालुका कराड येथे पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र येवती आणि कृष्णा हॉस्पिटल कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग  निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास प्रचंड असा प्रतिसाद मिळाला .या शिबिराचे उद्घाटन सरपंच सागर शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले .

या वेऴी कराडच्या गटविकास अधिकारी साळुंखे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती .यावेळी त्या बोलताना म्हणाल्या  की पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसा दिनी हा राबवलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. येवती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटल चे  वैद्यकीय पथकातील डॉक्टर यांनी हे शिबिर उत्तम रित्या पार पाडले .या शिबिरास अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी नितीन मोरे,अतुल काकडे,संजय पाटील ,विकास कांबळे,बाळकृष्ण कुंभार ,प्रताप भणगे ,भैरवनाथ दुध डेअरी च्या चेअरमन रेखा शेवाळे, येवती ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ,कृष्णा कॅम्पचे सुपरवायझर सुनील यादव माजी चेअरमन दादासो शेवाळे युवा नेते राजेंद्र शेवाळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी  येवती  गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .