मा.ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन.
मा.ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन.
कराड - प्रतिनिधी.
पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबीर . येवती तालुका कराड येथे आयोजित केले आहे.अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान शिबीर सोमवार दिनांक १० ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळी १० ते १ या वेऴेत आयोजित करण्यात आले आहे, या शिबिरामध्ये जनरल मेडिसिन तज्ञ , शस्त्रक्रिया तज्ञ, दंतचिकित्सा तज्ञ ,बालरोग तज्ञ ,स्त्री रोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, आदी तपासण्या करून मोफत औषधे दिली जाणार आहेत, सदर मोफत शिबिराचा लाभ गावातील नागरिकांनी व परिसरातील नागरिकांनी घ्यावा. सर्वरोग निदान शिबिर येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये घेण्यात येणार आहे .या या शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरेंद्र माळी कृष्णा हॉस्पिटल चे नामवंत डॉक्टर उपस्थित राहणार आहेत .जनसंपर्क अधिकारी विक्रम पवार,माणीक साळूंखे,हर्षल जगताप व कॅम्प सुपरवायझर सुनील यादव,जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होणार आहे

Comments
Post a Comment