कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी, घोगावं येथे ताण तणाव या विषयावरती व्याख्यान संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी, घोगावं येथे  ताण तणाव या विषयावरती व्याख्यान संपन्न.

कराड - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्मसी) घोगाव येथे कृष्णा इन्स्टिट्यूट मानसोपचार ऑफ सायन्स  विभागाच्या मार्गदर्शक सौ वैशाली यादव मॅडम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  त्यांनी विद्यार्थ्यांना मानसिक ताण याविषयी मार्गदर्शन करताना ताण म्हणजे काय, ताण असावा की नसावा, ताणाची लक्षणे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच याच वयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात  बदल होत असतो त्यामुळे ताण येऊ नये यासाठी नियमित व्यायाम करावा ज्यामुळे मेंदूतील रसायन आपणाला तणावापासून दूर ठेवते असा संदेश दिला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी सौ वैशाली यादव मॅडम यांचे स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन  केतकी शिंदे मॅडम यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .