उंडाळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ. शोभा मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड.
उंडाळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ. शोभा मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड.
उंडाळे - प्रतिनिधी.
कराड दक्षिण मधील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या उंडाळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ.शोभा मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सदस्यांना सत्तेची संधी मिळावी या उद्देशाने ॲड. उदयसिंह पाटील यांनी सौ. शोभा मधुकर शिंदे यांना उपसरपंच पदाची संधी दिली.विद्यमान उपसरपंच श्री. बापूराव पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर सौ. शोभा मधुकर शिंदे यांची उपसरपंच पदाची संधी मिळाली. त्या ॲड उदयसिंह पाटील गटाचे समर्थक आहेत. या निवडीनंतर रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील दादा यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी ग्रामसेवक शरद चव्हाण, सरपंच संगीता माळी, ग्रामपंचायत सदस्य दादासो पाटील, अजित कदम, गणेश पाटील ,बापूराव पाटील, संगीता पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Post a Comment