येवती येथे धम्म ध्वजा रोहन व चबुतऱ्याचे उद्घाटन उत्साहात साजरे.
येवती येथे धम्म ध्वजा रोहन व चबुतऱ्याचे उद्घाटन उत्साहात साजरे.
उंडाळे - प्रतिनिधी.
येवती तालुका कराड येथे बौद्धजन हितवर्धक संघ येवती मुंबई ,यांच्या वतीने 66 व्या धम्म परिवर्तन दिनाच्या निमित्ताने धम्म ध्वजारोहण सोहळा आणि चबुतऱ्याचे उद्घाटन उसात साजरे झाले. याचे उद्घाटन राजेंद्र सोरटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाराष्ट्र पुरोगामी संघर्ष संघटनेचे सुभाष वायदंडे ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव ज्ञानेश्वर शेवाळे ,तरुण भारतचे पत्रकार आकाश सोरटे, येवतीचे उपसरपंच सविनय सोरटे, समाधान सोरटे ,कैलास सोरटे ,बौद्धजन हितवर्धक संघाचे सर्व पदाधिकारी, उपासक ,उपासिका, उपस्थित होते. यावेळी बोलताना वायदंडे म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचण्याचे काम आपण केले पाहिजे. आज चबुतऱ्यासाठी ज्यांनी जागा दान दिली ते राजेंद्र सोरटे यांचे मनापासून धन्यवाद जागा दान देण्यासाठी पण मोठे मन लागतं असे त्यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमास दत्ता कांबळे ,अमित कांबळे ,यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .जागा दान दिल्याबद्दल बौद्धजन हितवर्धक संघ येवती मुंबई यांच्यावतीने राजेंद्र सोरटे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.


Comments
Post a Comment