मिशन धाराऊ व राष्ट्रीय शालेय पोषण अंतर्गत साळशिरंबे अंगणवाडी येथे सुढृड बालक स्पर्धा .
मिशन धाराऊ व राष्ट्रीय शालेय पोषण अंतर्गत साळशिरंबे अंगणवाडी येथे सुढृड बालक स्पर्धा.
उंडाळे - प्रतिनिधी.
दिनांक 1 ऑगस्ट 30 सप्टेंबर या कलावधीत मिशन धाराऊ अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.याच उपक्रमांतर्गत अंगणवाडी साळशिरंबे ता.कराड येथे सुढृड बालक स्पर्धा आयोजित करण्यात आली .
या कार्यक्रमास मौजे साळशिरंबेच्या ग्रामपंचायत सदस्या सौ. स्मिता देशमुख यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली, या स्पर्धा प्रत्येक अंगणवाडी मधून 3ते6 व 3 ते 5 या वयोगटातील लाभार्थीची निवड करण्यात आली.ग्रा.प.सदस्या यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.बालकांचा महिन्याचा वाढता वजन दर या मध्ये श्रेणी ठरवलेली असते तर अंगणवाडीतील त्यांची उपस्थिती ,आहार ,लसीकरण,टी एच आर व वैयक्तिक स्वछता या गोष्टींची पडताळणी करून निकषानुसार पात्र या पात्र बालकांच्या मधून विजेता निवड करण्यात आली .
या कार्यक्रमास साळशिरंबे येथील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस , सर्व पालक , ग्रा.प.सदस्य उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे नियोजन साळशिरंबे येथील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस यांनी उत्तमरित्या केले , सर्व अंगणवाडीतील बालकांना खाऊचे वाटप करून स्पर्धेची सांगता झाली .

Comments
Post a Comment