गरबा खेळताना तरुणावर काळाचा घाला

 

गरबा खेळताना तरुणावर काळाचा घाला.

 कराड   - प्रतिनिधी.

  राज्यभरात सर्वत्र गरबा उत्सवाची धूम चालली असताना दु:खद वृत्त समोर आलं आहे.  वावोशी (खोपोली) येथील एका नवरात्र उत्सवात गरबा खेळत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यश सुभाष देशमुख   असं या तरुणाचं नाव आहे. मूळचा साळशि रंबे येथील परंतु कामानिमित्त खोपोली येथे राहणाऱ्या  यशचा मृत्यू झाल्यामुळे ऐन उत्सवात साळशिरंबे व परिसरात  शोककळा पसरली आहे.

यश आपल्या आई-वडिलांसोबत वावोशी येथे राहत होता.12 वी पास झाल्यानंतर तो आपल्या वडिलांना कुटुंबासाठी मदत व्हावी म्हणून कंपनीत काम करत होता. आई-वडिलांचा आधार होता. यश  हा खोपोली येथील एका खाजगी कंपनीत काम करत होता.ऐन 17वर्ष वयातच त्याच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर यशाच्या मृत्यूने साळशिरंबे परिसरात शोककळा परसली आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .