संतकृपा महाविद्यालयात 'महाराष्ट्र माझा' काव्य संग्रहाचे प्रकाशन व वितरण सोहळा संपन्न.
संतकृपा महाविद्यालयात 'महाराष्ट्र माझा' काव्य संग्रहाचे प्रकाशन व वितरण सोहळा संपन्न.
प्राचार्य डॉ. अरलेलीमठ होते. तर तृतीय वर्षात शिकत असलेले विद्यार्थी कवी विजय पवार प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. अरलेलीमठ म्हणाले, फार्मसी क्षेत्र आणि कविता या दोन विभिन्न गोष्टींची उत्तम सांगड विजय पवार यांनी घातली आहे. त्याला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
कवी विजय पवार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले. आपण कसे घडलो. यासाठी काय केले. कोणत्या लोकांच्या संगतीत आलो. जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्या आई वडीलांनी केलेला संघर्ष नेहमी डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केली पाहिजे. आपली उठबस आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या व्यक्तींबरोबर असली पाहिजे. या सूत्रीचा वापर करा. आयुष्यात कधी अपयश येणार नाही. आयुष्य जगत असताना संकटांचा सामना करावा लागतो.
आपल्या वाटेला येणारी वादळे आपल्याला संपवण्यासाठी नाही तर काही वादळे आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी असतात.
या नंतर मान्यवरांच्या कवी विजय पवार यांच्या 'महाराष्ट्र माझा' या कवीता संग्रहाचे पुनःप्रकाशन व वितरण पार पडले.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संचालिका प्राजक्ता जोहरी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले.

Comments
Post a Comment