कोडोली प्रशाला येथे भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न.

कोडोली प्रशाला येथे भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन  उत्साहात संपन्न.

कार्वे - प्रतिनिधी.

भारती विद्यापीठाचे,हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली ता. कराड जि. सातारा येथे भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेचा ध्वजारोहण स्वातंत्र्यसैनिक कै. गोविंद विठू पाटील यांचे सुपुत्र व माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.चंद्रकांत पाटील व माजी सैनिक श्री. मोहन पाटील नेर्लेक  अण्णा  यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संभाजी पाटील (नाना) होते. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.मोरे आय.जे. यांनी आपल्या  मनोगतामध्ये  देशाचे संरक्षण  करणाऱ्या वीर सैनिकांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली.व उपस्थितांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच संपूर्ण गावातून ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कोडोली येथे ध्वजारोहण करण्यात आले.   इ.8वी. ते इ.10 वी. मधील  वार्षिक परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमवेळी विद्यार्थ्यांनी भाषणे,  देशभक्तीपर आधारित विविध गीतगायन,नृत्य, झांजपथक, इ.सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम नृत्याविष्कार सादर केला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भारतीय विद्यापीठाचे सेवक श्री.तानाजी मोरे ,श्री. रामचंद्र मोरे कोडोली गावचे सरपंच,उपसरपंच , सदस्य, ग्रामसेवक ,विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक, पालक, ग्रामस्थ श्री. प्रसाद मोरे श्री. बाजीराव जगताप श्री. गंगाराम जगताप  उपस्थित होते.या समारंभास उपस्थित मान्यवरांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे उत्तम नृत्याविष्कार सादर केल्याबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संदे मॅडम यांनी केले. तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभ संदेश प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. जाधव मॅडम यांनी दिला.

आभार श्री.आंबे सर यांनी मानले.  या कार्यक्रमाची सांगता प्रशालीतील सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत, दानशूर सामाजिक संस्था व व्यक्ती यांचेमार्फत पौष्टिक खाऊ देऊन करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .