कोडोली हायस्कूल मध्ये PSI रोहित गुजर यांचा सत्कार.

 

कोडोली हायस्कूल मध्ये PSI रोहित गुजर यांचा सत्कार.

कार्वे - प्रतिनिधी.

भारती विद्यापीठाचे, हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली या प्रशालेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कोडोली गावचे सुपुत्र रोहित शांताराम गुजर यांची पोलीस निरीक्षक (PSI) म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला . यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक मोरे आय.जे. सर यांच्या हस्ते  शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रोहित गुजर यांनी  प्रशालीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व या कार्यक्रम प्रसंगी बोलताना ते म्हणाले, माणसाने नेहमी प्रयत्नवादी राहावे जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणती गोष्ट अशक्य नाही. पहिल्या प्रयत्नात यश आले नाही म्हणून खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावे. यश नक्कीच मिळते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदे मॅडम यांनी केले तर आभार आंबे सर यांनी मानले. या कार्यक्रमास प्रशालेतील  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी ,कोडोली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .