वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये 78 व्या भारतीय स्वातंत्र्याचा राष्ट्रीय उत्सव उत्साहात संपन्न.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये 78 व्या भारतीय स्वातंत्र्याचा राष्ट्रीय उत्सव उत्साहात संपन्न.
शिराळा -प्रतिनिधी.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात संपन्न झाला.राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन समारंभाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका ए. आर.पाटील मॅडम यांनी केले.भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा. एम . डी. पाटील सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या समारंभास श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील (भाऊ ) व संस्थेचे सर्व संचालक श्री. भैरवनाथ दूध संस्था चेअरमन व सदस्य , श्री. भैरवनाथ पतसंस्था चेअरमन व सदस्य तसेच सागाव चे माजी उपसरपंच सत्यजित पाटील, सागाव मधील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
या ध्वजारोहण समारंभ प्रसंगी राष्ट्रगीत झेंडा गीत सारे जहाँ से अच्छा महाराष्ट्र गीत आदी समूहगीते सुरेल आवाजात सादर करण्यात आली तसेच सागाव ग्रामपंचायत ध्वजारोहणास विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक उपस्थितीने समारंभाची शोभा वाढली.विद्यालयातील राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन उत्सवास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. सी. सदावर्ते सर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी सागाव मधील पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या समारंभाचे सूत्रसंचालन श्री . एस. एच इंगवले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन व्ही. डी. पाटील सर यांनी केले.

Comments
Post a Comment