वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव येथे शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव येथे शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न.
शिराळा -प्रतिनिधी.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये शिक्षण सप्ताहांतर्गत सातवा दिवस समुदाय सहभाग दिवस उत्हासात पार पडला .वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सांगावच्या वतीने प्रभातफेरी काढण्यात आली. ग्रामपंचायत - भैरवनाथ मंदिर परिसरात प्रथम फेरी काढण्यात आली. तसेच विद्यालयाची विद्याजली पोर्टलवर नोंदणी करण्यात आली. विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती अपलोड करण्याचे निश्चित केले. त्याचप्रमाणे विद्यालयातील स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. त्यांची नावे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली. याशिवाय पोस्टर मेकिंग, घोषवाक्य विषयी माहिती देण्यात आली. तसेच विद्यांजली कार्यक्रम माहिती देण्यात आली. वारणा विद्यालयातील विद्यार्थी -शिक्षकांच्या शिक्षण सप्ताहातील उत्स्फूर्त सहभागामुळे चैतन्य ,उत्साह निर्माण झाला. शिक्षण सप्ताहाच्या समारोहा प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.ए.सी. सदावर्ते सरांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमातून ज्ञानाबरोबर कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन स्वतः समर्थ बनावे असा संदेश दिला.अशाप्रकारे सातवा दिवस समुदाय सहभाग दिवस उत्साहात संपन्न झाला.

Comments
Post a Comment