स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

 स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.



शिराळा -प्रतिनिधी (नानासाहेब कांबळे.)

भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात देशभर साजरा केला. याच पार्श्वभूमीवर  गोंडवाना न्यूज परिवाराने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. गोंडवाना न्यूज परिवाराचे आधार प्रतीक्षा कांबळे व मीराताई कांबळे ,यांच्या सौजन्याने  प्राथ. शाळा, सिद्धार्थ नगर, आरळा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन गोंडवाना न्यूज परिवाराचे शिराळा प्रतिनिधी नानासाहेब कांबळे यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही, पेन चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी  आरळा गावचे ग्रामपंचायत सदस्य  माया कांबळे,निता कांबळे, माधुरी कांबळे, डॉ. विनोद झाडे, नंदा झाडे,रवि झाडे, करंगुली गावचे सरपंच आम्रपाली नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब शित्तूरकर, संत रोहिदास युवा महासंघ शाहुवाडी तालुका अध्यक्ष (शिराळे वरूण) उमेश कारंडे ,ज्ञानदेव कांबळे, चंद्रकांत कांबळे, भारतीय बौद्ध महासभा शिराळा माजी तालुकाध्यक्ष आशोक झाडे,तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिवराज जाधव सर, शिक्षक, शिक्षिका, व  ग्रामस्थ उपस्थित होते.








                आरळा :- विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना उपस्थित मान्यवर.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .