वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ,सागांव मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ,सागांव मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न झाली.
प्रारंभी भारतीय स्वातंत्र लढ्यातील युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे संचालक रघुनाथ पवार यांच्या हस्ते संपन्न झाले,तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संचालक डॉ .प्रकाश कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत दादा पाटील भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका ए.आर. पाटील मॅडम यांनी केले.या कार्यक्रमानिमित्त विद्यालयातील एस. एच. इंगवले सर यांनी लोकमान्य टिळक यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याबद्दल माहिती दिली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विश्व तसेच संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील योगदान याबद्दल सविस्तर माहिती विद्यालयातील शिक्षिका यु. आर. पाटील मॅडम यांनी माहिती दिली.
विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती यानिमित्त विद्यालयात निबंध स्पर्धेचा आयोजन करण्यात आले. इयत्ता ५ वी ते १२ वी लहान, मध्यम व मोठा अशा तीन गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक ए सी सदावर्ते सर यांचे मार्गदर्शन लाभले.हा कार्यक्रम सर्व शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंभार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन एस बी दिवे मॅडम यांनी केले.

Comments
Post a Comment