Posts

Showing posts from December, 2025

शाश्वत शेतीसाठी मृदा व पाणी परीक्षण करणे काळाची गरज

Image
  शाश्वत शेतीसाठी मृदा व पाणी परीक्षण करणे काळाची गरज____ प्रो डॉ. रत्नदीप जाधव. कराड - प्रतिनिधी.  श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत भूगोल विभागाच्या वतीने  मृदा व पाणी परीक्षण या विषयावरती कार्यशाळा संपन्न झाली. सत्र एकचे साधन व्यक्ती प्रो. डॉ. रत्नदीप जाधव विलिंगडन महाविद्यालय सांगली हे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, भारतासारख्या कृषिप्रधान देशात शाश्वत शेतीसाठी मृदा व पाणी परीक्षण करणे काळाची गरज आहे. पृथ्वीच्या भूपृष्ठावरील नऊ इंच मातीचा थर टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण यातूनच आपल्याला शेती करता येते. तो थर निघून गेला तर जमीन नापीक बनते. यासाठी मृदेत कोणते घटक आवश्यक आहेत. मृदा संवर्धनासाठी काय केले पाहिजे. याचे उत्तर मृदा परीक्षणातूनच मिळते. पाणी म्हणजे जीवन त्यामुळे आपण पिण्यासाठी जे पाणी वापरतो ते पिण्यायोग्य आहे की नाही यासाठी पाणी परीक्षण तितकेच महत्त्वाचे आहे. पाण्याचा टीडीएस किती पीएच किती हे तपासूनच  आपण त्याचा वापर केला पाह...

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मृदा व पाणी परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे

Image
  निसर्गातील बदलामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मृदा व पाणी परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे____ प्रो. डॉ. राजेखान शिकलगार.   कराड - प्रतिनिधी.   श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत भूगोल विभागाच्या वतीने मृदा व पाणी परीक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेच्या सत्र दोनचे साधन व्यक्ती प्रो. डॉ. राजेखान शिकलगार राजाराम महाविद्यालय कोल्हापूर हे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मृदा व पाणी परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसेंदिवस हवामानात अभूतपूर्व बदल होताना दिसत आहेत. पर्जन्याची अनिश्चितता त्यामुळे शेतकऱ्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिलेली आहेत. शाश्वत शेतीची संकल्पना राबवत असताना मृदा व पाणी परीक्षणासाठी जीआयएस सारखे तंत्रज्ञान वापरले तर शेती समस्येवर अचूक उपाय मिळतील. तसेच एखाद्या भूभागावरील विस्तृत स्वरूपात पाण्याची स्थिती काय आहे त्याचा सरासरी टीडीएस किती आहे पीएच...

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .

Image
  सोनवडे ग्रामपंचायतीला  आरोग्यविषयक कार्याचा विसर.   शिराळा – प्रतिनिधी.  ग्रामपंचायत ही संस्था गावाचा कारभार आणि विविध विकास योजना राबवित असेल तरच त्या गावाचा सर्वांगीण विकास होतो. सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने गाव कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायत कामकाज मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5 अन्वये चालतो तसेच नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. या सगळ्या प्रक्रियातून जाऊन सोनवडे (ता.शिराळा) ग्रामपंचायत स्थापन झाली. पण या ग्रामपंचायतीला आपल्या कार्याचा विसर पडलेला दिसून येतो.  कृषी पशुसंवर्धन, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, रस्ते बांधणी, ग्रामोद्योग आणि सहकार प्रशासन या प्रमुख कार्यासाठी ग्रामपंचायत काम करणं अपेक्षित असतं परंतु सोनवडे गावातील आरोग्य आणि रस्ते बांधणी या कार्यासाठी दुर्लक्ष केलेले अढळून येते.  जिल्हा परिषद शाळा सोनवडे ते तक्षशिला नगर  याकडे जाणारा ग्राम अंतर्गत रस्ता लोकांच्या रहदारीसाठी खुला आहे. पण तक्षशिला नगर  वस्तीतील सांडपाण्याची व्यवस्था दुर्लक्षित झाल्याचे आढळून येते, यामुळे रस्त्यावर गटारी...

ठाणे येथील सुप्रसिद्ध मनोविज्ञान समुपदेशक पुनम ताई यांच्या कार्यालयास पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची भेट

Image
  ठाणे येथील सुप्रसिद्ध मनोविज्ञान समुपदेशक पुनम ताई यांच्या  कार्यालयास  पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची भेट    गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- ठाणे येथील सुप्रसिद्ध मनोविज्ञान समुपदेशक पुनम ताई दबडे यांच्या ठाणे येथील लोढा पॅराडाईज येथे असणाऱ्या कार्यालयास अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष पत्रकार शेवाळ यांनी भेट घेतली, यावेळी त्यांचा सन्मान देखील करण्यात आला, त्यावेळी शिवतेज सामाजिक संस्थेचे सदस्य दत्तात्रय पवार हे उपस्थित होते, यावेळी संवाद साधताना पूनम ताई म्हणाल्या की मी  Psychology Counselor | Spiritual Healer  आहे. लोकांना प्रॉपर मार्गदर्शन करणे, त्यांच्या आयुष्यामध्ये घडत असलेल्या गोष्टी, त्यामध्ये त्यांना येणाऱ्या अडचणी यामध्ये  मानसिक आरोग्य, भावनिक समतोल आणि आत्मिक उपचार करून त्यांचा सेल्फ कॉन्फरन्स वाढवणे या क्षेत्रात मी कार्यरत आहे. Counseling, meditation, energy healing आणि spiritual guidance crystal therapy यांच्या माध्यमातून व्यक्तींना तणाव, नातेसंबंधातील अडचणी, आत्मविश्वासाची कमतरता आणि जीवनातील अडचणीवर कशाप्...

शिवसेना शाखा सूर्य नगर विक्रोळी मुंबई यांच्या वतीने पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचा सन्मान.

Image
  शिवसेना शाखा सूर्य नगर विक्रोळी मुंबई यांच्या वतीने पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचा सन्मान. मुंबई - प्रतिनिधी.  शिवसेना शाखा क्रमांक 120 सूर्य नगर विक्रोळी यांच्या वतीने दैनिक ललकार चे  कराड कार्यालय प्रमुख, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचा शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला, यावेळी शाखेचे शाखाप्रमुख निलेश पोहकर, शिवसेना शाखा संघटक उत्तमराव कुऱ्हाडे, निखिल गजरे ,संजय भालेकर, मल्हारी कवितके, अक्षय पाटील ,उमेश शेवाळे, दत्तात्रय पवार यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी बोलताना कुऱ्हाडे म्हणाले की पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचे सातारा जिल्हा सह कराड तालुक्यामध्ये त्यांनी आपल्या पत्रकारिता या क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे , प्रशासकीय क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे उत्तम संघटन कौशल्य, सकारात्मक पत्रकारिता त्यामुळे जनमानसात त्यांचे नवलौकिक आहे त्यांच्या या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

बार्टीकडून अनुसूचित जातीच्या युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत सी-डॅकच्या सहकार्याने पीजी सर्टिफिकेट प्रोग्रॅम.

Image
  बार्टीकडून अनुसूचित जातीच्या युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत सी-डॅकच्या सहकार्याने पीजी सर्टिफिकेट प्रोग्रॅम.   गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे—सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पीजी सर्टिफिकेट प्रोग्रॅम २०२६ अंतर्गत कौशल्य विकासासाठी प्रायोजकत्व जाहीर करण्यात आले आहे. हा उपक्रम सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक), पुणे येथील अ‍ॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग ट्रेनिंग स्कूल (ACTS) यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या पीजी सर्टिफिकेट प्रोग्रॅममध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र व यशस्वी उमेदवारांचे केवळ अभ्यासक्रम शुल्क बार्टीकडून प्रायोजित करण्यात येणार आहे. प्रायोजकत्वाचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी सी-डॅकच्या समुपदेशन प्रक्रियेद्वारे नेमून दिलेल्या केंद्रावर प्रवेश घेणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांनी...

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

Image
  बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप.  येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.   उंडाळे - प्रतिनिधी.  येळगाव जिल्हा परिषद गटातील घोगाव या ठिकाणी कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉ.अतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली येळगाव जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, नेते, बूथ अध्यक्ष यांच्या उपस्थितीत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्य वस्तूंचा संच वाटप याचा भव्य असा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये विविध लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार योजनेतून इसेन्शियल किट (पेठी) व सेफ्टी किट (बॅग) वाटप करण्यात आले. येळगाव जिल्हा परिषद मधील 1000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ देण्यात आला. या कार्यक्रमासाठी येळगाव जिल्हा परिषद गटातील  ऍड.मा.बाळासाहेब पाटील, भाजपा मंडल अध्यक्ष मा.प्रविण साळुंखे, भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील, येळगाव विकास सेवा सोसायटी चेरमन मा.अक्षय शेटे, सहकारमहर्षी स्व.जयवंतराव भोसले प...

कराड मधील प्रभाग क्रमांक पाच ब मधून राहुल भोसले विजयी.

Image
  कराड मधील प्रभाग क्रमांक पाच ब मधून राहुल भोसले विजयी. कराड : प्रतिनिधी. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे खंदे समर्थक कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत लोकशाही आघाडीचे प्रभाग क्रमांक पाच ब मधील  सर्वसामान्यांचे नेतृत्व, युवकांचे आयडॉल राहुल भोसले भैय्या यांनी 2717 एवढी भरघोस मते घेऊन निवडून आले, त्यांनी भाजपाच्या आणि काँग्रेस सह एका अपक्षाचा  दारुण पराभव केला, सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या राहुल यांनी विजय मिळवल्यानंतर राहुल भोसले यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला.

महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका गैर महायुती-गैर आघाडी सर्व पक्षांनी एकत्रित लढवाव्यात. - ॲड. (डाॅ.) सुरेश माने.

Image
महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका गैर महायुती-गैर आघाडी सर्व पक्षांनी एकत्रित लढवाव्यात.                         - ॲड. (डाॅ.) सुरेश माने.   गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-         महाराष्ट्रात नुकत्याच काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संपन्न झालेल्या आहेत तर जानेवारी २०२६ महिन्यात उर्वरित सर्व, महानगरपालिकासह निवडणुका संपन्न होणार आहेत. राज्यात या निवडणुकांत कॉंग्रेसप्रणित चार ते पाच प्रमुख राजकीय पक्षांची महाविकास आघाडी ही अस्तित्वाची लढाई लढणार असून भाजपाप्रणित चार-पाच प्रमुख राजकीय पक्षांची महायुती ही वर्चस्वाची लढाई लढणार आहेत. म्हणजेच एका अर्थाने महायुती व महाविकासआघाडी यांनी राज्यात राजकीय ध्रुवीकरणच केलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर महायुती व आघाडी यांच्या व्यतिरिक्त स्वतःची स्वतंत्र धोरणे व कार्यक्रम असणार्‍या दलित-आदिवासी-गरीब-ओबीसी व धार्मिक अल्पसंख्यांक समुदायाच्या न्याय हक्काचे व सशक्तिकरणाचे राजकारण करणार्‍या तमाम छत्रपती शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरी या राजकीय पक्षांनी व ...

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागांव 'चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

Image
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागांव 'चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न. शिराळा - प्रतिनिधी. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागांव मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. १७/१२/२०१५ रोजीउ त्साहात संपन्न झाला. या समारंभासाठी प्रमुख अतिथी सौ. शोभा संजय भोसले मॅडम होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष व शिराळा पंचायत समिती माजी सभापती मा-चंद्रकांतदादा पाटील (भाऊ) हे होते. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास संस्थेचे संचालक श्री. गजानन पाटील, सागांवचे माजी उपसरंपच व शिराळा भाजपा ग्रामीण अध्यक्ष मा. सत्यजीत पाटील (भैय्या), माजी मुख्याध्यापक श्री.ए. आर. पाटील सर, संजय काशीनाथ भोसले साहेब, लक्ष्मीकांत भोसले ,श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी सर्व संचालक, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक-पालक समिती अध्यक्ष व सदस्य विविध शाळांचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी, पत्रकार पालक, विद्यार्थी उपस्थित होते.पारितोषिक वितरण समारंभ स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.सी. सदावर्ते सर यांनी केले. अहवाल वाचन सौ.ए. आर. पाटील (साळ...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न.  उंडाळे- प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयामध्ये नुकतीच पालक सभा उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पालकांच्या निदर्शनास आणून देणे तसेच विद्यार्थी व पालक यांच्या समस्या सोडवणे या उद्देशाने या पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी पालकांना महाविद्यालयात झालेल्या परीक्षामधील गुण सांगून आमचे ध्येय शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट आणि सामाजिकरित्या औषध निर्माण शास्त्राचे संगोपन करणे हे असून त्यानुसार आम्ही पुढच्या शिक्षणाची तयारी करून घेत असतो तसेच कॅम्पस ड्राईव्हमधून प्रत्येक विद्यार्थ्याला  नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते असे त्यांनी सांगितले. ज्यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांची व्यवस्थित सांगड असेल त्यावेळेसच तो विद्यार्थी चांगला घडला जातो म्हणूनच पालकांनी प्रत्येक पालक मीटिंगला उपस्थित राहिलात तरच आपल्या पाल्याची शैक्षणिक स्थिती काय आहे हे समजेल तसेच तुमच्...

कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचणार.

Image
कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचणार. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-   भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, लिडकारच्या व्यवस्थापकीय संचालक संचालिका डॉ. के. एम. वसुंधरा, प्राडा समूहाच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रमुख लोरेंझो बर्टेली उपस्थित होते.शतकांपासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, प्राडाच्या आधुनिक व समकालीन डिझाईन शैली या माध्यमातून चप्पल विकसित केल्या जात आहेत. पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक लक्झरी फॅशनच्या मदतीने पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ मिळणार आहे. या विशेष चप्पला फेब्रुवारी २०२६ मध्ये प्राडाच्या ४० विक्री केंद्रांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.या उपक्रमा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळला जनसागर.

Image
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त   चैत्यभूमीवर उसळला जनसागर. रिपब्लिकन समाज पक्ष (BRSP) तर्फे भव्य माहिती व प्रचार स्टॉल उभारून केलं अभिवादन. मुंबई - प्रतिनिधी. छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे महामानव क्रांतिसूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुजन रिपब्लिकन समाज पक्ष (BRSP) तर्फे भव्य माहिती व प्रचार स्टॉल उभारण्यात आला.5 व 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून BRSP चे हितचिंतक, कार्यकर्ते, युवा व महिलांनी मोठ्या संख्येने भेट देत स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा उत्तरप्रदेश, कर्नाटक, हैदराबाद, दिल्ली, गुजरात, केरळ या राज्यांमधूनही पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व व आदरणीय ऍड. डॉ. सुरेश माने साहेबांचे निष्ठावंत समर्थक आवर्जून दादर येथे भेट देऊन आंदोलनाशी ऐक्य व्यक्त केले.महामानवांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी, संघटन वाढीसाठी आणि बहुजन स्वाभिमान जागृतीसाठी BRSP कडून नेहमीप्रमाणे सातत्यपूर्ण कार्य सुरू राहील, असा विश्वास मुंबई प्रदेश अध्यक्ष दिपक चौगुले य...

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- प्रादेशिक परिवहन कार्यालय

Image
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- प्रादेशिक परिवहन कार्यालय शालेय बस नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या २४९ वाहनांवर कारवाई   गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय बस नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांची  १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तपासणी करण्यात आली, या कारवाईत १ हजार ४६४ वाहनांची तपासणी करुन त्यापैकी २४९ वाहनांवर कारवाई करण्यात आली; यामाध्यमातून २२ लाख २२ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शालेय बस चालकांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष तथा पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी वेळोवेळी दिले आहेत. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन व वाहन मालकांनी दक्षता घ्यावी. शाळेच्या बसमध्ये ६ वर्षाखालील मुलांना ने-आण करण्याकरिता महिल...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे व्याख्यान संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे आर्ट ॲन्ड  सायन्स ऑफ टॅबलेट फॉरम्युलेशन डेव्हलपमेंट या विषयावरती सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी नोवारटीस हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे असोसिएटेड डायरेक्टर अभय वैद्य यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी टॅबलेट फॉरम्युलेशन कसे होते, टॅबलेटचे प्रकार किती आहेत, त्यांचे महत्त्व काय आहे तसेच टॅबलेट फॉरम्युलेशनचे कला आणि विज्ञान म्हणजे गोळ्या तयार करण्याची एक पद्धत आहे  ज्यामध्ये औषधे आणि योग्य सहाय्यक वापरून त्यांची योग्य घन मात्रा कशी तयार केली जाते याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.  वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अरुणा परीट यांनी मानले.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध ठिकाणी अभ्यास क्षेत्र भेटी.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध ठिकाणी अभ्यास क्षेत्र भेटी.   उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यासक्रमातील इतर प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे व अभ्यासक्रमांमध्ये अधिक ज्ञान तसेच आवड निर्माण होण्याकरिता  विविध ठिकाणांच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जलशुद्धीकरण प्रकल्प व सुमन मेडिकल मलकापूर (कराड) या ठिकाणी भेटींचे आयोजन करण्यात आले होते. फार्मसीमधील सोशल फार्मसी व फार्माकोग्नसी  या विषयातील फार्मसीच्या अभ्यासक्रमांतर्गत या भेटी देण्यात आल्या होत्या. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्स इन्चार्ज प्रा. पूजा भोसले व प्रा. तेजस्वी कांबळे यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी या भेटीचे आयोजन केले होते. या भेटीवेळी विद्यार्थ्यांसमवेत प्रा. पूजा भोसले, प्रा. तेजस्वी कांबळे, लॅब टेक्निशियन साधना सलगर हे उपस्थित होते.

महिला महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न.

Image
  महिला महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न.   कराड - प्रतिनिधी. महिला महाविद्यालय, कराड येथे दिनांक 25 नोव्हेंबर, 2025 रोजी ए.डी . श्राॅफ वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनींचा सहभाग होता. महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. भरत बल्लाळ हे अध्यक्षस्थानी होते . त्यांनी अध्यक्षीय  भाषणत ए.डी.श्राॅफ यांची भारताच्या आर्थिक  जडघडण  मधील महत्वाची भूमिकेचा उलघडा विद्यार्थ्यांसमोर केला .विशेष उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सोनटक्के उपस्थित होते . स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून इंग्रजी विभागाच्या प्रो.( डॉ.) उज्वला ताठे मॅडम तसेच वाणिज्य विभागाचे प्रा. किशोर गुजर ,अर्थशास्त्र विभागाचे प्रा. विनोद सागरे उपस्थित होते . या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस रूपये 2500/ हजार व प्रमाणपत्र कु.समीक्षा थोरात बी.ए.भाग- 2 यांनी प्राप्त केले.तर द्वितीय बक्षीस रूपये1500/ हजार व प्रमाणपत्र कु.स्नेहा भरमगौडा बी.ए.भाग - 3 मधील विद्यार्थीने प्राप्त केले. तृतीय बक्षीस रुपये 1000/हजार व प्रमाणपत्र कु. वैष्णवी कदम बी.ए. भाग 2 मधील विद्यार्थिनींनी...

गुढे पाचगणी व येवती उपसा सिंचन योजनेच्या सर्वे चे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कोल्हापूर येथील कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार.

Image
  गुढे पाचगणी व येवती उपसा सिंचन योजनेच्या सर्वे चे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कोल्हापूर येथील कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार: डॉ. भारत पाटणकर उंडाळे - प्रतिनिधी: गुढे पाचगणी व येवती उपसा सिंचन योजनेच्या उरलेल्या गावांचा सर्वे लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी नाशिक येथे पाठवण्यात यावे. आणि मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवण्याची सर्व कामे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करावी अन्यथा  12 जानेवारीला भव्य मेळावा घेऊन 26 जानेवारीला कोल्हापूर येथील पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी दिला, घोगाव ता कराड येथे संतकृपा मंदिरात पाणी संघर्ष समितीच्या वतीने पार पडलेल्या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते, यावेळी माजी सभापती हणमंत पाटील, उदय पाटील, बाळासाहेब माने, वसंत पाटील, सचिन मोरे, सखाराम पाटील ,प्रकाश काळे, सरपंच डांगे सर, मारुती देसाई, येळगावच्या सरपंच डॉ. अनुराधा माने यांच्यासह कराड तालुका, शिराळा आणि पाटण तालुक्यातील वाड्यावरस्त्यावरील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस...